आज धानोरा येथे असलेल्या जुन्या आदिवासी मुलींच्या वस्तीगृहाची आ.डॉ. मिलिंद नरोटे यांच्याकडून पाहणी करण्यात आली.
पाहणी दरम्यान वस्तीगृहाची सध्याची परिस्थिती व उपलब्ध सुविधा यांचे बारकाईने निरीक्षण करण्यात आले.
वस्तीगृह जुनं असलं तरी त्याचे स्ट्रक्चर सक्षम असून, योग्य रेनोव्हेशनद्वारे सुधारणा करता येऊ शकते.
येत्या काळात या वस्तीगृहाचे नूतनीकरण (Renovation) करून, त्याची क्षमता वाढवण्याचा गंभीर प्रयत्न केला जाईल, जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थांना निवासाची सुरक्षित व सुसज्ज सुविधा मिळेल.
“विद्यार्थिनींसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच निवासाचीही चांगली व्यवस्था असावी, ही माझी प्राथमिकता आहे. वस्तीगृहाच्या दुरुस्तीसाठी आवश्यक त्या सर्व पातळ्यांवर पाठपुरावा करून हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणार.”