प्रतिनिधी चंद्रपूर
तान्हा पोळा उत्सव समिती देवाडा.आपल्या येणाऱ्या पिढीला कृषिसंस्कृती शिकविणारा तान्हा पोळा, शिवराय आणि भीमराय यांचं स्मरण करून ईडा पीडा जाऊ दे बळीचे राज्य येऊ दे असे चिंतन करणारा पोळा.. आयोजित तान्हापोळा वेशभूषा स्पर्धा हनुमान मंदिर देवाडा परिसरात भव्य दिव्य कार्यक्रम पार पडला.गावातील तान्हा बाल-गोपाल वेगवेगळ्या वेशभूषेत आपली भूमिका साकारली.बैलाचे महत्व शेती,मानव जीवनात अतिशय महत्वाचे स्थान आहे.भारत हा कृषिप्रधान देश आहे.बैल हे शेतकऱ्यांचा आधारस्तंभ आहे.हे या कार्यक्रमात दिसून आले. या कार्यक्रमाला उपस्थित भाजपा युवा नेता आशिष भाऊ मासिरकर, सुनील मुळे, विशाल रामटेके उपसरपंच ग्रामपंचायत देवाडा, संदीप उपरे तंटामुक्त समिती अध्यक्ष, प्रबुद्ध मुळे,प्रशांत ताजने, भारतीताई शिंदे, निशाताई धोंगडे, डॉक्टर सुविधा ताजने , नंदा मुळे,व गावातील इतर प्रतिष्ठित नागरिक,महिलावर्ग,
युवती,युवक या सर्वांच्या प्रेक्षणीय उपस्थिती मध्ये कार्यक्रम तान्हापोळा कार्यक्रम पार पडला.