रिपब्लिकन सेना युवक आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी सय्यद अन्वर यांची निवड
पत्रकार परमेश्वर चांदणे इंडियन टीव्ही न्यूज
रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि बीड जिल्हा अध्यक्ष विजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली माजलगाव तालुक्यातील छत्र बोरगाव येथे संपन्न झालेल्या शाखा उद्घाटन सोहळ्या प्रसंगी रिपब्लिकन सेना युवक आघाडीच्या तालुका अध्यक्ष पदी सय्यद अन्वर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
यावेळी सेनेचे तालुका अध्यक्ष वशिष्ठ लांडगे वैजनाथ गडसिंग संतोष खुणे विलास खळगे शेख आर्षद भाई गंगाधर सोनपसारे विश्वनाथ तोडके विशाल ससाने भास्कर पौळ अशोक जाधव निवृत्ती गायकवाड बालासाहेब शिंदे बुद्धप्रेम डावरे महीपती कदम मोकिंदा खरात लहु ससाणे वामन पाईक सय्यद नाजेर भाई ओमप्रकाश टाकणखार हनुमंत मोरे गणेश ढगे विशाल साळवे आनंद साळवे यांच्या सह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजय साळवे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगीतले की
रिपब्लिकन सेनेचे ध्येय-धोरण म्हणजे समानता, बंधुता व न्यायावर आधारित समाज घडवणे, जातीयता व अन्यायाविरुद्ध ठाम भूमिका घेणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.
या वेळी उपस्थितांनी आनंद व्यक्त करत नवनिर्वाचीत अध्यक्षाचे अभिनंदन केले व सय्यद अन्वर यांनी रिपब्लिकन सेनेच्या ध्येय-धोरणांनुसार संघटन वाढवण्याचा व युवकांना पक्षाशी जोडण्याचा निर्धार व्यक्त केला.