पुणे महानगरपालिका निवडणूक २०२५ च्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर जैन समाजाचे संघटित आणि प्रभावी राजकीय प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने “पुणे सकल जैन समाज मेळावा” वर्धमान सांस्कृतिक भवन बिबवेवाडी येथे उत्साहात पार पडला. मेळाव्यास दीड हजार हून अधिक जैन अनुयायांनी हजेरी लावली.
हा मेळावा उपाध्याय प्रवर परमपूज्य प्रवीणऋषीजी महाराज यांच्या पावन सानिध्यात, अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघ यांच्या वतीने वर्धमान सांस्कृतिक भवन, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यात जैन समाजातील विविध संघटना, संस्था, ट्रस्टचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच असंख्य युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. समाजाच्या राजकीय सहभागाची दिशा, एकजूट आणि आगामी निवडणुकांमधील जैन समाजाचा प्रभावी सहभाग या विषयांवर सखोल चर्चा झाली.
“जैन समाजाची संघटित शक्ती आणि युवकांचा सक्रिय राजकीय सहभाग हे समाजाच्या सशक्त भविष्यासाठी अत्यावश्यक आहे तसेच धर्मापेक्षा पक्ष मोठा नाही, जैन समाजातील जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी पण सर्वांनी प्रयत्न करूया असल्याचे मत आयोजक आदिनाथ स्थानकवासी जैन ट्रस्ट चे अध्यक्ष अनिल नहार, जैन अल्पसंख्यांक महासंघ चे राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी आणि प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष महेंद्र सुंदेचा मुथ्था यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात माजी मंत्री राजेंद्र बाबू दर्डा, विजय भंडारी, अभय छाजेड, अनिल नहार, इंदर छाजेड, सुनील लोढा, लक्ष्मीकांत खाबिया, बाळासाहेब ओसवाल, प्रविण चोरबोले, राजेंद्र बाटीया, हरेश शहा, प्रशांत देसरडा यांनी इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन केले.
मेळाव्यादरम्यान विविध राजकीय पक्षांतील जैन समाजातील सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली
भारतीय जनता पक्ष: महेंद्र सुंदेचा मुथा, प्रवीण चोरबोले, बाळासाहेब ओसवाल, आनंद छाजेड, भरत भुरट, विपेश सोनीग्रा, अरविंद कोठारी, प्रतीक देसरडा, राजू बाफना, कुंतीलाल चोरडिया, श्रीमल बेदमुथा, प्रकाश बाफना, प्रीती पाटील
काँग्रेस: भरत सुराणा, आनंद बाफना, योगिता सुराणा, अरुण कटारिया
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट): निलेश शहा, प्रशांत गांधी
राष्ट्रवा