सहकार मंत्री श्री अतुल सावे यांच्या हस्ते होणार पुरस्काराचे वितरण…
दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी जागतिक सहकार वर्षांनिमित्त सहकार क्षेत्रातील प्रगत अनुभव आव्हाने आणि भविष्यातील दिशा घडून आणण्यासाठी ग्रीन वर्ल्ड व कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार मंथन 2025 या कार्यक्रमाचे आयोजन सहकार सभागृह विद्यापीठ रोड शिवाजीनगर पुणे येथे आयोजित करण्यात आलेले आहे…
या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा. श्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ग्रीन को 2025 या पुरस्काराने माजलगाव शहरातील श्री मंगलनाथ मल्टीस्टेट या संस्थेला सन्मानित करण्यात येणार आहे…
या कार्यक्रमाचे उद्घाटक अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विकास मंत्री महाराष्ट्र राज्य अतुल सावे,सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य डॉ. संजय कोलते, अध्यक्ष कॉसमॉस को-ऑपरेटिव बँक लिमिटेड ॲड.प्रल्हाद कोकरे, प्रजासक राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई चे श्री विद्याधर अनासकर हे उपस्थित राहणार आहेत..
सहकार क्षेत्रामध्ये मराठवाड्यातील साखर कारखाने जिनिंग्स व विविध सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहकारी संस्थांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे…
श्रीमंगलनाथ मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष श्री आर.जी कानडे व संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक ॲड.रवींद्र कानडे यांनी या पुरस्काराबद्दल माध्यम अशी बोलताना सांगितले की, संस्थेच्या पारदर्शक व्यवहार वेळेवर कर्जवाटप व वसुली ठेवीदारांचा विश्वास संपादन, स्वयंरोजगार निर्मिती,महिला व युवक सक्षमीकरण व त्याचबरोबर सामाजिक उपक्रम या सर्व बाबींची दखल घेत श्री मंगलनाथ मल्टीस्टेट ही संस्था या पुरस्काराची मानकरी ठरली आहे.
श्री मंगलनाथ मल्टीस्टेटच्या सातत्यपूर्ण व लोकाभिमुख कामगिरीची ही पोच पावती आहे. निश्चितच हा पुरस्कार माजलगाव चे नाव लौकिक करत असून संस्थेच्या कार्याला अधिक प्रेरणा व ऊर्जा देणार आहे सदरील पुरस्कार संस्थेचे हितचिंतक,सभासद सर्व कर्मचारी वृंद यांच्या सहकार्याचे व परिश्रमाचे फलित असून सदरील पुरस्कार त्यांना समर्पित करण्यात येत आहे..