आज गडचिरोली पोलीस दलातर्फे आयोजित ‘गडचिरोली महोत्सव 2025’ कार्यक्रमास माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून महोत्सवास भव्य स्वरूप प्राप्त करून दिले.
यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते
🎖 क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतील विजेत्या संघांना पारितोषिक व धनादेश प्रदान करून उत्साहवर्धन करण्यात आले.
तसेच ‘C-60 युनिट’च्या सन्मानार्थ विशेष दिनदर्शिकेचे प्रकाशन करीत शौर्य, समर्पण आणि अदम्य जिद्दीला सन्मान देण्यात आला.
🏆 स्पर्धेतील विजेते संघ :
🥇 कबड्डी : धानोरा उपविभाग
🥇 वाॅलिबाॅल : एटापल्ली उपविभाग
🥇 रेला नृत्य : सिरोंचा उपविभाग
गडचिरोलीच्या सांस्कृतिक परंपरा, क्रीडा कौशल्य आणि वीर जवानांच्या पराक्रमाचा संगम असलेला असा ‘गडचिरोली महोत्सव’ जिल्ह्याच्या अभिमानात भर टाकणारा ठरला!
जय गडचिरोली!