जानेफळ येथे साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
जानेफळ (प्रतिनिधी): अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठान, जानेफळ यांच्या वतीने साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली.
यावेळी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि परिवर्तनवादी विचारांचा गौरव करत त्यांच्या कार्याचा आदर्श समाजाने घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते *मोहन भाऊ धोटे* शिवसेना शहर प्रमुख मंटू भाऊ राजूरकर,विशाल फितवे अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठान चे पदाधिकारी सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडले. उपस्थितांनी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपत सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा संकल्प व्यक्त केला.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.