
इंडियन टीव्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी वाशिम
वाशिम – समाजाला एकजूट करणार्या व १० लाख सदस्यांची संघटना असलेल्या सावता परिषदेच्या वाशिम जिल्हा उपाध्यक्षदी येथील सक्रीय कार्यकर्ते रविभाऊ वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली. सोमवार, १६ जुन रोजी स्थानिक विश्राम भवनात झालेल्या बैठकील जिल्हयातील पदाधिकार्यांची निवड करण्यात आली.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणकाका आखाडे, प्रदेश कार्याध्यक्ष पांडूरंग कोठाळे यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष विलास ढगे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. रंजना संतोष पारिस्कर यांच्या उपस्थितीत रविभाऊ वानखेडे यांना जिल्हा उपाध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र देण्यात आले. रविभाऊ वानखेडे हे गेल्या अनेक वर्षापासून समाजसेवेत कार्यरत असून समाजाच्या विकासासाठी ते पुढाकार घेत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेवून त्यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. या निवडीमुळे वानखेडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मिळालेल्या जबाबदारीमुळे काम करण्याचा उत्साह वाढला असून समाजाचे सशक्त संघटन करण्यासाठी अधिक जोमाने कार्य करु अशी ग्वाही रविभाऊ वानखेडे यांनी निवडपत्र स्विकारतांना दिली. यावेळी बैठकीला जिल्हा कार्यकारणी सदस्य सौ. वंदना वानखेडे, जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा इंगळे, शहर महासचिव अशोक इंगळे, उपशहराध्यक्ष सुनील वानखेडे, शहर कार्यकारणी सदस्य सागर शिंदे, उपशहराध्यक्ष वैभव वानखेडे, रिसोड शहराध्यक्षा सौ. रेखा जहिरव, रिसोड तालुकाध्यक्षा सौ. दिपाली काळे यांच्यासह किशोर मोरे, सागर शिंदे, अशोक इंगळे, आकाश लोलप, सुनिल इंगळे, कृष्णा इंगळे, संतोष वानखेडे, फकीरा करडीले, गोविंद भोसले, संतोष खुनारे, गणेश खुनारे, वंदना वानखेडे, सुनिल वानखेडे, महेश सारसकर, प्रमोद उलेमाले, वैभव वानखेडे, कृष्णा तुरेराव, तुषार वाघमारे, साहिल वानखेडे, गजानन धोंगडे, शिवा धोंगडे, सतिश शिंदे, महेश शिंदे, रामा ठाकरे, महादेव गायकवाड, रवि वानखेडे, गजानन वानखेडे, संतोष चौधरी आदी उपस्थित होते.