इंडियन जिल्हा प्रतिनिधी प्रताप नागरी वाशिम
योगाचार्य डॉ.भगवंतराव वानखेडे
जिल्हाध्यक्ष भारत स्वाभिमान पतंजली ट्रस्ट यांचे अमुल्य मार्गदर्शन
आनंदी आयुष्य, उत्साही मन आणि निरोगी शरीर ही त्रिसूत्री फक्त योगामुळे शक्य
वाशिम आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाबाबत जागृती आणि रुचि निर्माण व्हावी या हेतूने वाशिम येथील कला, क्रीडा, खेळ, सांस्कृतिक क्षेत्र व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेली शिक्षणसंस्था द वर्ल्ड स्कूल येथे २१ जुन शनिवार रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी वाशिम येथील सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त योगतज्ञ डॉ .भगवंतराव वानखेडे ,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भावना सुतवणे, उपमुख्याध्यापक मनोज सुतवणे, शैक्षणिक प्रमुख सौ. खंबायत ,समन्वयक माधुरी गोरे योगप्रशिक्षक सुखदेव राजगुरू ,विलास ठाकरे ,योग ठाकरे ,यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
याप्रसंगी वाशिम येथील सुप्रसिद्ध योगतज्ञ डॉ. भगवंतराव वानखेडे यांचे शॉल ,श्रीफळ ,पुष्पगुच्छ व शाळेचे स्मृतिचिन्ह देवून भव्य स्वागत व सत्कार प्रिन्सिपल सौ. भावना सुतवणे व मनोज सुतवणे यांनी केला.सहयोगी प्रशिक्षक सुखदेव राजगुरू ,विलास ठाकरे व योग ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागतसत्कार करण्यात आला.
आपल्या मनोगतात योगतज्ञ,यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना उत्तम मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळण्यासाठी विविध आसने त्याचे महत्व विशद केले. आपल्या टीम मेम्बर्स सह या योगा कार्यशाळेमध्ये योगतज्ञ डॉ.भगवंतराव वानखेडे यांनी विविध सूक्ष्म व्यायाम,सूर्यनमस्कार, विविध आसने करवून घेवून त्याची माहिती व सखोल योगाभ्यास उपस्थित शिक्षकवृंद आणि उपस्थित विद्यार्थी यांच्याकडून करून घेतला.
कार्यक्रमाचे सुंदर नियोजन ज्ञानेश्वर उखळे, भरत गायकवाड प्रशांत शेळके यांनी केले. कार्यक्रमाला
माधुरी गोरे, प्रतिभा मालस, स्नेहल बरगटे ,शितल तिवारी, नूतन कव्हर, गायत्री पांडे, पल्लवी जोशी, किरण वैद्य, भरत गायकवाड, सिमा कड, जसप्रीत सेठी, आरती देव, सीमा कड ,ईशा राजगुरू ,आरती घोरमोडे,नूतन कव्हर ,सोनाली भान्दुर्गे ,अश्वथी एम.,नारायण ठेंगडे , विक्की इंगळे ,आकाश मनवर,अक्षीता किडसे ,आरती पटेल ,अंजली जगताप ,वीमल सर ,मेघा इंगळे ,समीक्षा ठावकर ,मेघा जाधव ,नेहा दारव्हेकर ,प्रतीक्षा वानखेडे ,प्रियदर्शनी भड ,रेणुका साबळे ,स्नेहल नरवाडे,प्रशांत शेळके ,ज्ञानेश्वर उखळे ,नेहा जोशी ,पोफळे ,जीया तिवारी ,गजानन ठाकरे ,संदिप कुटे ,सागर काटे ,वैभव इंगळे ,भांदुर्गे ,मंगेश खाणभरड ,कृष्णाभैया ,दुर्गाप्रसाद अंभोरे ,मंदा इंगोले
यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सौ.प्रतिभा मालस व सौ. मेघा जाधव यांनी आपल्या सुंदर शैलीतून केले. योगादिनाच्या व विश्वसंगीत दिनाच्या निमित्ताने प्रिन्सिपल सौ. भावना सुतवणे यांनी सर्वांना मनस्वी शुभेच्छा देवून व योगाचार्य डॉ.वानखेडे यांच्या व कुटुंबाच्या योगसेवेची विस्तृत माहिती देवून या निःशुल्क समाजसेवेची व योगदानाबाबत प्रशंसा करून या सेवेला सलाम करून आभार व्यक्त केले.
संस्थेचे अध्यक्ष सुनिल कदम व सचिव पंकज बाजड यांनी योगतज्ञ डॉ.भगवंतराव वानखेडे व परिवार यांच्या योगसेवेच्या या उदात्त कार्याची प्रशंसा करून मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या योगदिनाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांकडून मोबाईल न वापरण्याचा संकल्प करून कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने आणि भारत मातेच्या जयघोषाने झाली.
सौ. प्रतिभा मालस यांनी सर्व पाहुण्यांचे आणि उपस्थितांचे शाळाप्रशासनाच्या वतीने आभार व्यक्त केले.