इंडियन टीव्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी प्रताप नागरे वाशिम
अविनाश किसन राठोड व य 40 वर्ष असे विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्याने दिनांक
16 /06 /2025 रोजी आसेगाव पोलीस स्टेशन आवारात विष प्राशन केले होते, अविनाश किशन राठोड यांचे शेती एकांबा शिवारात गट नं.76/77 असून शेतीच्या किरकोळ वादातून
गजानन अशोक चव्हाण
अंशीबाई अशोक चव्हाण
सुधाकर गोपा चव्हाण
साई गोपा चव्हाण या सर्वांनी मिळून अविनाश राठोड यांना दि 16/ 06 /2025 रोजी सकाळी 6:00 वाजताच्या दरम्यान घरातून बाहेर काढत खूप मारहाण केली, जीवे मारण्याची व हातपाय तोडण्याची धमकी दिली व पोलीस अधिकारी आमचं काही बिघाडू शकत नाहीत असे बोलून निघून गेले. त्यामुळे अपमानित आणि व्यथीत होऊन अविनाश राठोड यांनी आसेगाव पोलीस स्टेशन तालुका मंगरूळपीर गाठले व तेथे स्टेशन अधिकाऱ्यांना तक्रार घेण्याची विनंती केली परंतु पोलिसांचे मारहाण करणाऱ्यांशी साठेलोटे असल्यामुळे त्यांनी दीड ते दोन तास बसवून सुद्धा तक्रार घेण्यास नकार दिला त्यामुळे अपमानित झालेल्या अविनाश राठोड यांनी पोलीस स्टेशन आसेगाव परिसरातच विष प्राशन केले त्यामुळे घाबरलेल्या आसेगाव पोलीस स्टेशनच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांना आसेगाव पीएचसी येथे नेले परंतु तब्येत जास्त सिरीयस असल्यामुळे त्यांनी वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतः आणून सोडले व त्यांच्या मुलाला ब्रह्मा अविनाश राठोड याला फोन करून सांगितले की तुझ्या वडिलांनी विष प्राशन केले आहे त्यांना आम्ही वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात आणून सोडले आहे तुम्ही येऊन त्यांना ऍडमिट करा म्हणून फोन ठेवून दिला परंतु उपचार घेत असताना दिनांक 19 /6/ 2025 रोजी त्यांची तब्येत जास्त सिरीयस झाल्यामुळे अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले होते पण तिथे उपचार घेत असताना
दि 21/06/ 2025 रोजी रात्री एक ते दीडच्या दरम्यान त्यांचा मृत्यू अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे झाला त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचे शव दि.21 /06 /2025 रोजी आसेगाव पोलीस स्टेशनच्या आवारात आणून पोलिसांना पुन्हा तक्रार घेण्यासाठी विनंती करत असताना पोलिसांनी पोलीस स्टेशनचे मुख्य द्वार बंद करून त्यांना आत मध्ये येण्यास मज्जाव केला परंतु काही लोकांनी विरोध केल्यामुळे त्यांनी आत मध्ये येऊ दिले व पुन्हा तक्रार घेण्यास टाळाटाळ केली याउलट मृत शेतकऱ्याला न्याय देणे ऐवजी व शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत असणाऱ्या पोलिसांनी मृत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना धारेवर धरून त्यांनाच याउलट पोलिसा विरुद्ध जर तुम्ही कोणाला तक्रार केली तर खोट्या केसेस करून जीवे मारण्याची धमकी दिली व केस आपसात करून घ्यावी असा दबाव मृत शेतकऱ्याच्या नातेवाईकावर टाकत आहेत, व मृत्यूस कारणीभूत असलेले आरोपी व आसेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी मोकाट फिरत आहेत हा प्रताप आसेगाव पोलीस स्टेशन तालुका मंगरूळपीर करीत आहे तरी नातेवाईकांची मागणी आहे की जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालावे अन्यथा जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय समोर आंदोलन करण्यात येईल