येथील मुख्य बसस्टँड चौकातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक, पादचारी तसेच व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका वाढला होता. या गंभीर समस्येची दखल घेत शिवसेना शहर प्रमुख मंटूभाऊ राजूरकर तथा युवासेना शहर प्रमुख आकाश सवडतकर यांनी बुलढाणा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) तातडीने खड्डे बुजविण्याची मागणी करून सातत्याने पाठपुरावा केला.
या पाठपुराव्याची दखल घेत संबंधित विभागाने बसस्टँड चौकातील खड्डे बुजविण्याच्या कामास सुरुवात केली. कामावेळी शिवसेना शहर प्रमुख मंटूभाऊ राजूरकर, युवासेना शहर प्रमुख आकाश सवडतकर,तसेच कपिल सरदार, आकाश मुरडकर ओम मादणकर उपस्थित राहून कामाची पाहणी केली.
यावेळी उपस्थितांनी रस्त्याची दुरुस्ती केवळ तात्पुरती न करता दर्जेदार व टिकाऊ स्वरूपात करावी, तसेच भविष्यात संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करून नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा द्यावा, अशी मागणी केली. बसस्टँड चौक हा गावातील अत्यंत वर्दळीचा मार्ग असल्याने येथे सुरक्षित व सुरळीत वाहतूक व्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने नियमित देखभाल करावी, असेही त्यांनी सांगितले.
स्थानिकांनीही सुरू झालेल्या कामाचे स्वागत करत, पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अशा दुरुस्तीची कामे वेळेत करण्यात यावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
रोहित शिंदे / जिल्हा बुलढाणा
ITN National News District reporter