इंडियन टीव्ही न्यूज ( ITN National )जिल्हा प्रतिनिधी प्रताप नागरे वाशिम
मंगरुळपीर येथील वाय सी सिबिएससी स्कुलमध्ये भरली ‘विठ्ठल नामाची शाळा’
चिमुकल्या वारकर्यांनी काढली दिंडी
दिंडीमध्ये दिला पर्यावरण संवर्धनाचा अनमोल संदेश
मंगरुळपीर:-मंगरुळपीर येथील सिबिएससी इंग्लीश स्कुलमध्ये विठ्ठलनामाचा गजर करत चिमुकल्या वारकर्यांनी दिंडी काढत डोळ्याचे पारणे फेडणारे रिंगण करुन विठ्ठलनामाची शाळा भरवुन संस्कती जोपासण्याचा सामाजिक ऊपक्रम साजरा केल्यामुळे सर्वञ कौतुक होत आहे.
आषाढी एकादशीनिमित्त मंगरूळपीर शहरातील सिबिएससी इंग्लीश शाळेत दिंडी काढण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी,संत जनाबाई,संत मुक्ताबाई, वारकरी आणि विविध संतांच्या वेशभूषा परिधान करून दिंडीत सहभाग घेतला. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात दिंडी काढण्यात आली.शाळेतील विद्यार्थ्यांनी दिंडीत विविध वेशभूषा करून सहभाग घेतला. यामध्ये विठ्ठल-रुक्मिणी, संत, वारकरी यांच्या वेशभूषांचा समावेश होता.दिंडीत टाळ-मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करण्यात आला, ज्यामुळे शाळेत भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.या दिंड्यांमध्ये पर्यावरण संरक्षणासंदर्भात जनजागृती देखील करण्यात आली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटले.तसेच सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात करण्यात आला. वाईट गोष्टींपासून दूर राहणे आणि चांगल्या गोष्टींचा स्वीकार करणे अशी शिकवणुक विद्यार्थ्यांना या ऊपक्रमातुन देण्यात आली.यावर्षी मंगरूळपीर शाळेत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली ज्यामुळे विद्यार्थ्यांना वारीची माहिती मिळाली आणि भक्तीमय वातावरणाचा अनुभव घेता आला.या आषाढी एकादशीच्या ऊपक्रमासाठी शाळेचे प्राचार्य डॉ. संजीव कुमार सिंग,शिक्षिका वैशाली धागे, स्वाति रघुवंशी,समीर नंदावाले,प्रीति ठाकरे,कोमल म्हातारमारे,निधि बजाज,अंकित जवळकर,स्नेहल साधु, दीपाली भोजने,माधुरी रक्षे,राम वानखडे,भूषण ठाकरे,भूमिका ऊज्जेनकर,श्रीकांत राउत,अक्षय इंगोले,हरीश सावंत,वकील खान,योगेश बहाकर,हरिष डहाके,ओम येवले आदींनी परिश्रम घेतले.