
अर्जुनी मोर : गोंदिया जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून अति मुसळधार पावसाने सुरुवात केली असून, जिल्ह्यातील अर्जुनी मोरगांव तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे, तालुक्यातील अनेक छोटे मोठे नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशातच अर्जुनी मोरगांव तालुक्यातील पिंपळगांव/खांबी येथील सावरटोला रोड वरती महादेव बोळी पाऊसाच्या पाण्याने भरली . आज दिनांक २१/०७/२०२४ रजनीश वामन शिवणकर शाळेत जाऊन गुरु पूजा केली व घरी आला.
आज सकाळी १०:३० वाजता दरम्यान पिंपळगांव येथील तिन मुले आंघोळ करायला गेले असता आंघोळ करतांना पाण्यामध्ये पोहता न आल्याने महादेव बोळी याठिकाणी रजनीश वामन शिवनकर हा १० वर्षाचा मुलगा पाण्यात बुडाला मृत्यु पावला. सोबत त्याचा मोठा भाऊ व एक मित्र होता त्याला पाण्यामध्ये आंघोळीला गेले आंघोळ करत असता, बुळतांना पाहिल्यानंतर सोबत असलेला त्याचा मोठा भाऊ गावामध्ये सांगायला आले. या ठिकाणी गावातील लोकांची गर्दी झाली. लगेच त्याला पाण्याबाहेर काढून ग्रामीण अर्जुनी मोरर ठाणेदार कमलेश सोनटक्के बीटअमालदार कोडापेयांनी पंचनामा करून छवविच्छेदना करिताअर्जुनी मोर नेण्यात आले. छवविच्छेदनंतर कुटुंबीयांच्या स्वाधीन करून पिंपळगाव येथे त्यांच्यावर सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्करण्यात आले