बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी ; अजितदादांना भिडणार

युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आल्याने बारामतीत आता काका विरुद्ध पुतण्या असा सामना रंगणार, हे स्पष्ट झालं आहे।

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आज अखेर आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केलेल्या 45 उमेदवारांच्या या यादीत सर्वांत लक्षवेधी नाव आहे ते बारामती विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराचे. बारामतीतूनशरद पवारांच्या राष्ट्रवादीने युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीकडून स्वत: अजित पवार हे बारामती मतदारसंघातून मैदानात असताना आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आल्याने बारामतीत आता काका विरुद्ध पुतण्या असा सामना रंगणार, हे स्पष्ट झालं आहे।

लोकसभा निवडणुकीपासून अजित पवारांचे सख्ख्ये पुतणे युगेंद्र पवार हे बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाले होते. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी युगेंद्र यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. या निवडणुकीत बारामती तालुक्यातूनही सुप्रिया सुळे यांना ४८ हजारांहून अधिक मताधिक्य मिळाल्याने विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या पक्षात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात बारामती लोकसभा मतदारसंघात झालेली पवार विरुद्ध पवार राजकीय लढाई चांगलीच चर्चिली गेली. या लढाईचा दुसरा अंक विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे।

पवारांच्या पहिल्या उमेदवार यादीत कोणा-कोणाला स्थान?

इस्लामपूर- जयंत पाटीलकाटोल- अनिल देशमुखघनसावंगी – राजेश टोपेकराड उत्तर – बाळासाहेब पाटीलमुंबा कळवा – जितेंद्र आव्हाडकोरेगाव – शशिकांत शिंदेवसमत – जयप्रकाश दांडेगावकरजळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकरइंदापूर – हर्षवर्धन पाटीलराहूरी – प्राजक्त तनपुरेशिरुर- अशोक पवारशिराळा – मानसिंगराव नाईकविक्रमगड – सुनील भुसाराकर्जत-जामखेड – रोहित पवारअहमदपूर – विनायकराव पाटीलसिंदखेड राजा – राजेंद्र शिंगणेउदगीर – सुधाकर भालेरावभोकरदन – चंद्रकांत दानवेतुमसर – चरण वाघमारेकिनवट – प्रदीप नाईकजिंतूर – विजय भांबळेकेज – पृथ्वीराज साठेबेलापूर – संदीप नाईकवडगाव शेरी -बापूसाहेब पठारेजामनेर – दिलिप खोडपेमुक्ताईनगर – रोहिणी खडसेमुर्तीजापूर -सम्राट डोंगरदिवेनागपूर पुर्व – दिनेश्वर पेठेतिरोडा – रविकांत बोपचेअहेरी – भाग्यश्री आत्रामबदनापूर – रुपकुमार चव्हाणमुरबाड – सुभाष पवारघाटकोपर (पुर्व) – राखी जाधवआंबेगाव – देवदत्त निकमबारामती – युगेंद्र पवारकोपरगाव – संदीप वर्पेशेवगाव – प्रताप ढाकणेपारनेर – राणी लंकेआष्टी- मेहबूब शेखकरमाळा – नारायण पाटीलसोलापूर शहर उत्तर – महेश कोठेचिपळून- प्रशांत यादवकागल – समरजीत घाटगेतासगाव -कवठेमहंकाळ – रोहीत पाटीलहडपसर – प्रशांत जगताप। 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 बारामती युगेंद्र पवार पश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 NCP राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार।

पुणे महाराष्ट्र प्रकाश बळीराम सोनवणे असोसिएट हेड इंडियन टीव्ही न्यूज महाराष्ट्र

Leave a Comment