
माजलगाव विधानसभेसाठी मोहनराव जगताप तर परळी मतदारसंघांमधून राजेसाहेब देशमुख फायनल
पत्रकार परमेश्वर चांदणे इंडियन टीव्ही
राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी च्या लढती अंतिम झाले असून शेवटच्या अंतिम याद्या जाहीर झाले आहेत बीड जिल्ह्यातील माजलगाव व परळी या तालुक्यांमध्ये ज्याकडे लक्ष लागलं होतं त्या देखील याद्या आज जाहीर झाल्या माजलगाव मधून मोहनराव जगताप तर परळी शहरांमधून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर.
गेली अनेक वर्ष एकनिष्ठ काम करणारे रमेशराव आडसकर हे गेल्या वेळेस माजलगाव विधान सभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांना चांगल्या प्रकारे चुरस पाहायला मिळाली होती परंतु लोकसभेसाठी पंकजाताई निवडणुकीस सामोरे जात असताना विरोधकांचे काम केल्याप्रकरणी पक्षाने रमेश आडसकर यांच्या वरून नाराजगी करून पक्षाने त्यांना बाहेर काढले गेली त्यामुळे ते राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार सामील होण्यासाठी प्रयत्न करत होते आणि दुसरीकडे भाजपा मध्येच काम करणारे पक्षाने आपल्याला उमेदवारी न दिल्याने नाराज असलेली छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मोहनराव जगताप हे देखील राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे तिकिटासाठी जोर धरून होते माजलगाव मतदार संघामध्ये हे दोन बलांडे नेते शरद जी पवार यांच्याकडे ठाण मांडून बसली होती एकेकाळी माजलगाव वडवणी धारूर शहरामध्ये रमेश आडसकर यांना आडसकर यांचा हावडा असं म्हणायचे परंतु मोहनराव जगताप यांनीच आडसकर यांना हावडा दिल्यासारखं माजलगाव शहरांमध्ये पहावयास मिळाला आहे आता या येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके शरद पवार गटाचे मोहनराव जगताप अपक्ष असलेले महादेव तात्या निर्मळ ही पुरंदर लढत माजलगाव शहरांमध्ये पहावयास मिळणार आहे
तर परळी शहरांमध्ये अजित पवार गटाचे धनंजय मुंडे. राष्ट्रवादी शरदचंद्रजी गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे