महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे

महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ सभा

राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहण्याचे काम केले आहे. या भागात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सिंचनाची साधने असल्याने शेतकरी धानासह इतर पिकांचे उत्पादन घेत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्यावतीने किसान सन्मान निधीचे १२ हजार ऐवजी आता १५ हजार देण्याचा आमचा वादा आहे अशी ग्वाही खा. प्रफुल पटेल यांनी दिली. महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ गोंडी मोहल्ला, आझाद चौक, पोहरा ता. लाखनी येथे आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना बोलत होते. यावेळी सर्वश्री अविनाश ब्राह्मणकर, सुनील फुंडे, प्रकाश बाडबुधे, तु. रा. भुसारी गुरुजी, शिवराम गिऱ्हेपुंजे, विनायक बुरडे, धन्नू व्यास, डॉ शहारे, रामलालजी पाटणकर, नागेश पाटील वाघाये, उमरावजी आठवले, हेमकृष्ण वाडीभस्मे, सूर्यभान सिन्घनजुडे, दादुभाऊ खोब्रागडे, श्रावण कापगते, त्रिवेणीताई पोहरकर, अर्चनाताई ढेंगे, दत्ताभाऊ हाटनागर, शारदाताई मते, ज्योतीताई सपाटे, रेवताताई पटले, अश्विनीताई फटे, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. खा. पटेल म्हणाले, विकास कामे करताना कार्यक्षम व खंबीर व्यक्तित्व असले पाहिजेत, विधानसभा क्षेत्रात विकास कामं चांगली व्हावीत, विकासाची तळमळ आणि ती कामं पूर्णत्वास नेण्याची क्षमता असलेला प्रामाणिक माणूस अविनाश ब्राह्मणकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून या भागाच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करण्याचे आवाहन केले. साकोली मतदारसंघातील मतदारांनी कायम आपल्याला साथ देत विश्वास व्यक्त केला आहे.

गोंदिया रिपोर्टर

महेंद्र कनोजे

मो:07798817224

Leave a Comment