पत्रकार परमेश्वर चांदणे इंडियन टीव्ही
माजलगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्रजी पवार यांची मंगलनाथ मैदान या ठिकाणी नियोजित सभा आयोजित केली होती परंतु काही कारणास्तव शरदचंद्रजी पवार ये मोहनरावजी जगताप यांच्या प्रचारार्थ सभेस येऊ शकले नाही परंतु ज्याला ससद रत्न म्हटले जाते आशा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी माजलगाव मैदान ची सभा मोठ्या प्रमाणात गाजवली
या जाहीर सभेस या बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे व मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय नेते तथा दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक माननीय मिलिंद नाना आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते तसेच खेड्यापाड्यातून येणारे हे मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आले पुढे बोलताना सुप्रियाताई यांनी येथील आमदारावर टीका न करता भाजप सरकारवर जोरदार टीका केली आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी शेतकऱ्यांचे प्रश्न ऊसाला भाव असेल महागाई असेल शेतकऱ्याच्या पिकाला योग्य भाव दिला जात नाही आमचं सरकार आल्यास योग्य भाव दिला जाईल असं देखील त्यांनी आश्वासन दिलेलं आहे मराठा आरक्षणामध्ये ज्या लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत जर सत्तेत आलो तर आम्ही सर्व गुन्हे मागे घ्यायला लावू असंही त्यांनी म्हटलं आहे ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी हे भाजपाचे पंतप्रधान होते त्यावेळेस भाजप हा चांगला पक्ष होता परंतु ज्या वेळेस पासून मित्रपक्ष तयार झाले तेव्हापासून हा पक्ष लाता भुक्क्या मारणारा पक्ष आहे असेही त्यांनी आपल्या वक्तव्यातून म्हटलं आहे ज्या ज्या पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत त्यांचेच हे चिन्ह चोरून आज निवडणूक लढवत आहेत या संदर्भात माझी हायकोर्टामध्ये माझा दावा चालू आहे आणि असंही घड्याळ हे कोणी वापरत नाही आता अँड्रॉइड मोबाईलचा वापर केला जातो म्हणून घडीचा वापर आता बंद झाला आहे आणि तुतारी धारी मनुष्य हे चिन्ह देवी देवतांनी दिल्यासारखं माझ्या पदरात टाकला आहे तरी अशा माझ्या गरीब तुम्ही या जिल्ह्याचे खासदार बनवलं आमदार बनवावं आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचे हात बळकट करावे असही त्यांनी या जाहीर सभेत संबोधित करताना सांगितलं या मतदारसंघांमध्ये मला मत मागायची संधी मिळत आहे याचा मला खूपच अभिमान आहे आणि कौतुकही वाटत आहे तरी या माझ्या गरीब मोहन दादाला मोठ्या प्रमाणामध्ये तुतारीधारी मनुष्य या चिन्हावर बटन दाबून विजय कराल असं म्हटलं आहे।