भाजपातून हकालपट्टी झालेल्या घृष्णेश्वर पाटील चे तत्कालीन खासदारां वरील आरोपांचे पत्र व्हायरल

भाजपातून हकालपट्टी झालेल्या घृष्णेश्वर पाटील चे तत्कालीन खासदारां वरील आरोपांचे पत्र व्हायरल

 

“विद्यमान लोकप्रतिनिधींवर आरोप करायची घृष्णेश्वर पाटील ची नेहमीचीच सवय; तात्या बनला गंमतीचा विषय”

 

चाळीसगाव प्रतिनिधी:- पक्षविरोधी कारवायांमुळे नुकतेच भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या माजी नगरसेवक घृष्णेश्वर पाटील ने ज्या माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या सोबत उबाठा मधे प्रवेश केला आहे त्याच माजी खासदार वर देखील काही वर्षांपूर्वी खुले पत्र व्हायरल करुन गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे. आता देखील घृष्णेश्वर पाटील ने फेसबुक लाईव्ह करुन विद्यमान आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यावर विविध आरोप करुन पक्षशिस्त मोडली होती आणि पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर उबाठा गटात प्रवेश करुन माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या सोबत गेल्याने शहरात एकच चर्चा सुरू झाली आहे. ज्यांच्यावर काही दिवसांपूर्वी अत्यंत गंभीर आरोप केले होते आता पुन्हा त्यांच्याच मांडीवर जाऊन बसलेत, जे अगोदर वाईट दिसत होते ते आता अचानक चांगले कसे वाटायला लागले तात्याला? अशी चर्चा आता लोकांमध्ये होत असून नेहमीच स्वताच्या घुमजाव पणामुळे तात्या आता कॉमेडीचा विषय झाल्याचे बोलले जात आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या विरोधात तत्कालीन खासदार उन्मेष पाटील यांनी पक्षविरोधी काम केल्याचे व दुसऱ्या कोणालाच तिकिट मिळू नये कोणताच कार्यकर्ता मोठा होऊ नये म्हणून उन्मेष पाटील यांनी पत्नी साठी उमेदवारी चा हट्ट धरला होता असादेखील गंभीर आरोप घृष्णेश्वर पाटील यांनी माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यावर केला होता. आणि मग आता अचानक तात्याला असा कोणता साक्षात्कार झाला की तात्यांना तेच उन्मेष पाटील आता चांगले वाटू लागले आहे आणि तेव्हा जे आरोप तात्याने उन्मेष पाटील वर केले होते बरोबर तेच आरोप आता विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर देखील केले आहेत. घृष्णेश्वर पाटील चे तत्कालीन खासदार उन्मेष पाटील यांच्या वर केलेल्या आरोपांचे पत्र व्हायरल होत असल्याने घृष्णेश्वर पाटील पुन्हा एकदा तोंडावर पडले आहेत आणि हे आरोप करणं त्यांचं नेहमीचेच असल्याचे सगळ्यांना समजून आले असून तात्या आता गमतीचा विषय झाल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment