सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मीक अण्णा कराड अखेर पोलिसांना शरण येणार
सीआयडी पथकाकडून वेगाने तपास सुरू
पत्रकार परमेश्वर चांदणे मराठवाडा चीफ ब्युरो इंडियन टीव्ही
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे आणि या कारणामुळे महाराष्ट्र पूर्णपणे हादरला देखील आहे याच अनुषंगाने बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर संपूर्ण बीड जिल्ह्यासह दिग्गज नेत्यांनी संतोष देशमुख हात्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला होता यावेळी संतोष देशमुख यांची मुलगी याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोर्चामध्ये सहभागी होण्याची हाक दिली होती त्या हाकेला साथ देत लाखोच्या संख्येने या ठिकाणी जिल्ह्यातील समाज बांधव उपस्थित झाला होता अनेक दिग्गज नेत्यांनी अनेक नेत्यांवर व वाल्मीक कराड वर जोरदार टीका शेत्र केले होते
एकूण आज या घटनेला 21 दिवस उलटले असून तेव्हापासून वाल्मीक कराड हे फरार आहेत मात्र सीआयडी पथकाने त्यांचे बँक खाते गोठवले आहे तसेच वाल्मीक कराड यांची जी संपत्ती आहे जप्त करण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया च्या हालचाली चालू आहे
वाल्मीक कराड यांच्याकडे कुठलाही पासपोर्ट नाही त्यामुळे देशाबाहेर जाणे अशक्य आहे
वाल्मीक कराड यांच्या निकटवर्ती यांची पोलीस कसून चौकशी करत आहेत यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये ताण येत आहे तसेच आपले खाते संपूर्ण गोठवण्यात आल्याने आपल्यासमोर कुठलाही पर्याय नाही त्यामुळे मी पोलिसात शरण जात आहे असे सांगितले जात आहे आज सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवारी शरण येईल असे सांगितले जात आहे
वाल्मीक कराड यांच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे असा आरोप करण्यात येत आहे बीड जिल्हाधिकाऱ्यांवर काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झालेल्या नेत्यांकडून हा आरोप करण्यात आलेला आहे या कारणामुळे धनंजय मुंडे देखील अडचणीत सापडले आहेत रोजच्या रोज धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा ही देखील मागणी जोर धरून होती