खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी सुनावले अधिकाऱ्यांना खडेबोल

भंडारा/गोंदिया :- भंडारा जिल्ह्यातील जाणारा नॅशनल हायवेमुळे नेहमीच रोडवर जाम लागतो त्यामुळे भंडारा फुलमोगरा ते पलाडी या १४.५ किमी चा ४७० करोड रुपयांची निधी मधून बायपास तयार होत आहे यात अनेक अंडर पास व गावाला जोळणारे रोड तयार करण्यात आले आहेत या रोडवर अनेक दिवसांपासून मोठया प्रमाणात वाढ निकृष्ठ दर्जाचे बांधकामाचे अनेक तक्रारी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा.डॉ.प्रशांत पडोळे यांच्या कडे आलेल्या होत्या. त्यामुळे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांनी आज दिनांक ३० डिसेंम्बर २०२४ ला सकाळीच ११ वाजता खासदार हे बायपास रोडवर जाऊन धडकले यात कवडसी फाटा पासून रोडच्या साईड मोठ्या प्रमाणात खड्डेमय झाले तरी देखील आज पर्यंत यावर खड्डे भूजले नाही त्यामुळे या परिसरात मोठया प्रमाणावर काही युवकांना त्याचे प्राण देखील गमवावे लागले आहेत . खासदार पडोळे यांनी बायपास रोडवर जाऊन बांधकामाचे निरीक्षण केले यात त्यांना मोठ्या प्रमाणावर निकृष्ठ दर्जाचे बांधकामे दिसून आले होते. रोडच्या बाजुतील मातीवरील मोठे गोट्या खालील माती पाण्यात वाहून गेला कोरंभी परिसरातील क्रॉस बेरिअर हे एका साईड ला वाकले असून रहदारी सुरू झाली तर केव्हाही मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही , त्यामुळे खासदार यांचा भडकले, त्यांनी बांधकाम कंत्राटदार यांना धारेवर धरले, बांधकाम कंत्राटदार यांनी खासदारांना उडवाउडवीची उत्तरे दिली, संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क केला, तेही निष्क्रिय आहेत असेही समजले. त्यामुळे नॅशनल हायवेच्या अधिकारी यांना देखील यासर्व निकृष्ठ दर्जाचे बांधकाम आल्याची तक्रार हायवे अधिकारी यांना त्वरित या बांधकाम कंत्राटदार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. निकृष्ट दर्जाचे बांधकाम असल्याचे पाढा जेव्हा वाचला तेव्हा सर्वच बांधकाम कंत्राटदार हे स्तब्ध होऊन बघतच राहिले. त्यामुळे अनेक ठिकाणी अद्यापही काम पूर्ण झाले नसल्याने जानेवारी मध्ये एक साईड सुरू होणारा यावर पाणी फिरल्याचे दिसून आले, या धडक कार्यवाही मध्ये प्रामुख्याने

नेतुत्व भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा.डॉ.प्रशांत पडोळे,

जि.प.सदस्य प्रेम वनवे, अजय मेश्राम, लोकमत जिल्हा प्रतिनिधी मानवटकर, पवन वंजारी, प्रवीण उदापुरे, गिरीश रहांगडाले, विवेक पडोळे, मुकुंद साखरकर, पंकज सार्वे, विजय दुबे, उमेश मोहतुरे, विनीत देशपांडे, पन्ना सार्वे, राधे भोंगाडे, अमित हुमने, हरीचंद्र बाभरे,नितेश मारवडे, बाल्या बांते, किशोर शेंडे, मनोज लुटे, तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. संबधीत बांधकाम निकृष्ट दिसून आले, सुरक्षा वॉल पूर्णत तेढि तर रस्त्याला मोठं मोठया भेगा पडल्या दिसून आल्या. उडवाउडवीत उत्तरे यावेळी मिळाली.

 

प्रवीण शेंडे

ब्युरो चीफ गोंदिया

Leave a Comment