तिरोडा/ ग्लोरीयस माऊंट अकॅडमी चुरडी/तिरोडाच्या वतिने वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित जिल्हा परिषद सदस्य जगदिश बावनथडे यांच्या हस्ते उद्घाटन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली,
कार्यक्रमा प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांनी बावनथडे म्हणाले शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान प्राप्त करणे नसुन तर स्वतःच्या अंगी असलेल्या कला व गुणांना ओडखुन त्यानुसार आपले आयुष्य घडवने होय,
आपल्या ज्ञानाचा लाभ आपल्याला आपल्या परिवाराला तर होतोच पण त्याच सोबत त्याचा लाभ समाजाला सुध्दा झाला पाहिजे,
आजचे युग तंत्रज्ञानाचे युग असुन तंत्रज्ञान शिकने गरजेचे आहे,
महापुरूषांचा जिवनातील संघर्ष समजुन घेऊन आपण त्याचा अंगीकार करून समाजासाठी प्रेरणा बनु शकतो असे प्रतीपादन केले,
जिल्हा परिषद सदस्य जगदिशजी बावनथडे यांच्या सह प्रा.श्री.अनुप बोपचे सर तसेच शिक्षक, शिक्षीका, असंख्य विद्यार्थी, पालकगण आणी प्रमुख पाहुणे उपस्थित होते…!
प्रवीण शेंडे
ब्युरो चीफ
गोंदिया