
8तिरोडा: आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जनसंपर्क कार्यालयात युवा नेते श्री रविकांत बोपचे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हा अध्यक्ष श्री सौरभ रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली तिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस(श. प.) पक्षाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्ष विस्तार, संघटन बांधणी व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आदी विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली.
यासह रिक्त तालुका अध्यक्ष पदावर सर्वानुमते माजी जि. प. सदस्य श्री कैलाश पटले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करीत जिल्हा अध्यक्ष श्री सौरभ रोकडे व युवा नेते श्री रविकांत बोपचे यांच्या हस्ते नवनियुक्त तालुका अध्यक्ष श्री कैलाश पटले यांना नियुक्ती पत्र देत पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आले.
या नियुक्ती कार्यक्रमाप्रसंगी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वात कार्यरत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे व पुरोगामी विचार अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे व पक्षासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करण्याचे आश्वासन नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष यांच्या तर्फे देण्यात आले. यासह शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य गरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी पुर्ण ताकतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काम करणार असल्याचे निर्धार यावेळी करण्यात आले.
या बैठकीत जिल्हा अध्यक्ष श्री सौरभ रोकडे, युवा नेते श्री रविकांत बोपचे, विधानसभा अध्यक्ष श्री ओमप्रकाश रहांगडाले, गोंदिया तालुका अध्यक्ष श्री खोमेंद्र कटरे, शहर अध्यक्ष श्री रविंद्र वंजारी, महिला अध्यक्ष सौ. भाग्यश्री केळवतकर, श्री आशिष येरपुडे, युवक अध्यक्ष श्री रविकुमार कुर्वे, सरपंच श्री राजकुमार ठाकरे, सरपंच छायाताई टेकाम, सौ मेघाताई बिसेन, श्री महेश कुकडे, उपसरपंच राजू भोयर, श्री नासीर घानीवाला, श्री विजय बिसेन, श्री संजय रहांगडाले, श्री उमाशंकर पटले, श्री विजय बुद्धे, श्री संजय धूर्वे, श्री राजेन्द्र पटले, श्री मंगेश गेडाम, श्री जॉनी सैय्यद, श्री देवकुमार झरारीया, श्री बाबुराव डोमळे, श्री राजकुमार ठाकरे आदींसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रवीण शेंडे
ब्युरो चीफ
गोंदिया