महाबोधी महाविहार मुक्ती साठी धरना आंदोलन

गोंदिया – महाबोधी महाविहार प्रबंधन एक्ट १९४९ रद्द करुन बौध्दगया येथील महाविहाराचे प्रबंधन बौध्द भिक्षु, बौध्द समुदायाला देण्यात यावे. या मागणीसाठी पुज्य भंते अनागरिक धम्मपाल, पुज्य भंते सुरई ससाई यांच्या नेतृत्वाखाली मागील अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मागील २० फेब्रुवारी पासून बौध्दगया येथील भंते विनाचार्य व हजारो पुज्य भंते यांनी उपोषण सुरू केले आहे. 

या महाबोधी महाविहाराला ब्राह्मण महंतांच्या ताब्यातून मुक्त करून हि विश्व धरोहर बौध्द धर्मियांना देण्यात यावे, म्हणून पहिल्या टप्प्यात ६ मार्च ला दुपारी बारा वाजेपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेजवळ, प्रशासकीय इमारत समोर गोंदिया इथे शांतीमय धरना आंदोलन करण्यात येणार आहे. या धरना आंदोलनात सर्व बौध्द उपासक – उपासिका, आणि आंबेडकरी चळवळीतील अनुयायांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भंते श्रध्दाबोधी, महाबोधी महाविहार मुक्ती कृती समिती गोंदिया यांनी केले आहे.

प्रवीण शेंडे

ब्युरो चीफ गोंदिया

Leave a Comment

05:23