जंगलाला वणव्यापासुन ( आगी ) वाचवीने प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य : सरपंच शिशुपाल रहांगडाले

जंगलाला वणण्यापासुन (आगी) वाचवीण्याचे अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था ( NGO ) कडून केली जात आहे जनजागृती…..

*( गोंदिया ) तिरोडा तालुक्या अंतर्गत येत असलेल्या जंगल व्याप्त ग्राम भजेपार – चोरखमारा येथे जागतीक महिला दिना निमित्त अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था ( NGO ) एकोडी- गोंदिया द्वारा आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना सरपंच शिशुपाल रहांगडाले यांनी मार्ग दर्शन करतांनी सांगीतले की सद्या उन्हाळ्याचे दिवस लागलेले असुन या काळात जंगलाला वणव्यापासुन ( आगी ) वाचवीने ही प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे असे ते यावेळी बोलत होते. कारण जंगलाला वणव्यापासुन वाचवील्यास वन्य जीवास होणारा धोका व झाडांचे होणारे नुकसानी पासुन बचाव होईल असे त्यांनी यावेळी सांगीतले. सदर कार्यक्रमाला सरपंच शिशुपाल रहांगडाले, संस्थेचे अध्यक्ष राजेशकुमार तायवाडे, उपाध्यक्ष आरिफ़ पठान, पत्रकार हितेश वालदे, उषा टेकाम, सिमा रिदमार्थी, निर्मला भांडारकर, पितेश्वरी बिसेन, वर्षा परतेती निर्मला रहांगडाले, रिंकी मडावी, इंदु रहांगडाले, देवराज बिसेन, किशोर शेंडे, विजय कुमसनाथी तसेच गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्याने उपस्थित होते.*

गोंदिया जिला रिपोर्टर
महेंद्र कनोजे

Leave a Comment