
महिला सशक्तीकरणाचे पाऊल:शेलुबाजार येथे जागतीक महिला मॅराथॉन स्पर्धा उत्साहात,
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांची उपस्थिती,
मंगरुळपीर : महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यांना सामाजिक व शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने प्रोत्साहन देण्यासाठी शेलूबाजार ग्रामपंचायतीच्या वतीने दि.८ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त भव्य मॅराथॉन स्पर्धा घेण्यात आली.या मॅराथाॅन स्पर्धेला वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस उपस्थित होत्या.
मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार ग्रामपंचायतकडुन विविध लोकोपयोगी ऊपक्रम सातत्याने राबविले जातात.दि.८ मार्च रोजी सकाळी ७ वाजता वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या उपस्थितीत भव्य मॅराथाॅन स्पर्धा ऊत्साहात पार पडली.यावेळी शेलुबाजारच्या सरपंचा प्रमिलाबाई सिताराम पवार,सचिव विलास गव्हाणे,जि.प.सदस्य,पं.स.सदस्य,डाॅ.महिद्रा आडोळे,बाबाराव पवार,मोहन राऊत,पांडुरंग कोठाडे,सचिन डोफेकर,रजनिश कर्नावट,अंगनवाडी सेविकामंदाताई गिर,मदतनिस ताई डोके,आशावर्कर योगीता डोके,महिला बचतगटाच्या तेजस्विनी काळे,पारूताई गावंडे,ज्योती लोकरे,पिएसआय राठोड,पोलीस कर्मचारी,लक्ष्मीचंद हायस्कुलच्या विद्यार्थीनी,तसेच गावातील महिलांची उपस्थिती होती.स्पर्धेनंतर विजयी महिलांना ट्राफी,मेडल आणी प्रशस्तीपञक देवुन गौरविन्यात आले.स्पर्धेत सहभागी महिलांनाही प्रशस्तीपञक देवुन सन्मान करण्यात आला.या मॅराथॉनमध्ये अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा वर्कर, बचत गटाच्या महिला तसेच शाळकरी मुली मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्यासोबतच त्यांच्यातील आत्मविश्वास आणि समाजातील सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला गेला.महिला सशक्तीकरणाच्या दिशेने ग्रामपंचायतीचा हा स्तुत्य उपक्रम ठरला आहे असे मान्यवरांनी मत व्यक्त केले.