
कराड शहरापासून काही अंतरावर असणारे आगाशिवनगर येथील 10
कुटुंब गेली 40 वर्षांपासून रेशनकार्ड पासुन वंचित राहिल्यामुळे त्या 10 कुटुंब शासनाकडून मिळणार्या योजनेपासून वंचित राहिले होते.ही सर्व कुटुंब भटके विमुक्त समाजातील आहेत. परंतु कराड तालुका कोल्हाटी समाज सघटनेचे अध्यक्ष सनी दिलीप जावळे यांच्या अथक प्रयत्नानंतर तहसीलदार कार्यालयात जाऊन पाठपुरावा करून पुरवठा अधिकारी साहिला नायकवडे यांच्याशी संपर्क साधून आमच्या कुटुंबांना रेशनकार्ड मिळावे असा मागणी अर्ज सादर करण्यात आला. त्या अर्जावर तहसीलदार कल्पना ढवळे व पुरवठा शाखेच्या अधिकारी साहिला नायकवडे यांनी तात्काळ या अर्जावर विचार करून योग्य निर्णय घेऊन लगेच मदत करण्याचे आश्वासन दिले. आणि लगेच काही दिवसात तहसीलदार कल्पना ढवळे व पुरवठा अधिकारी साहिला नायकवडे यांनी तात्काळ निर्णय घेऊन रेशनकार्ड वाटप करण्यात आले.यावेळी संघटनेचे अध्यक्ष सनी जावळे व सर्व कोल्हाटी समाजातील लोकांनी सर्व अधिकारी वर्गाचे आभार मानले.रेशनकार्ड मिळाल्यामुळे त्या सर्व कुटुंबाना शासनाकडून नव्याने आलेल्या घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे.
सातारा सुहास पाटील