
प्रवीण शेंडे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी
गोंदिया – कल दिनांक 16/4/2025 ला गोंदिया शहरातील नामांकित टाईल विक्रेता असलेला एका समज कंठकाला गोंदिया येथील भीम सैनिकांनी चांगलंच चोप देऊन त्याची दिंडी शहरात काढली. मिळालेल्या माहितीनुसार असे आहे की, गोंदिया शहरातील एका नामांकित टाईल विक्रेता चिराग संदीप रुंघटा रा. गणेश नगर गोंदिया याच्या रुंघटा कॉम्प्लेश इथे काम चालू आहे त्यात त्याने महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व मक्का मदिना असलेल्या टाईल्स चा वापर त्या ठिकाणी केला ज्या ठिकाणी लोक थुकात, ही बाब एका भीम सैनिक कश्यप राजाबाबा वासनिक याच्या लक्षात आली त्या भीम सैनिकांनी त्याला सांगितले की तुम्ही या ठिकाणी महामानवाची टाईल्स लावून महामानवाचा अपमान करीत आहात त्यावर तो समाज कंटक उलट उत्तर देत माझे घर आहे मी काहीही लावू शकतो मला कोणची भीती नाही असे उलट सुलट उत्तर देत कश्यप वासनिक ला धमकाऊ लागला, पण कश्याप वासनिक च्या शरीरात बाबासाहेबाचा रक्त वाहत आहे हे त्या समाज कंटकाला माहित नव्हते जेव्हा बाबासाहेबाचा आन बान शान चा प्रश्न येतो तेव्हा भीम सैनिक मरण्यास आणि मारण्यास कधीही मागे नसतो, ज्या बाबासाहेबानी आम्हा लोकांसाठी आपल्या परिवाराची सुद्धा पर्वाह न करता समाजाचे उद्धार केले अश्या महामानवाचा अपमान एक भीम सैनिक कशा सहन करू शकतो, कश्यप आणि अजून काही भीमसैनिकांनी त्या समाज कंठकाला त्याच ठिकाणी चांगलाच चोप देत अर्ध नग्न करून शहरात फिरवत महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ घेऊन येत त्याला माफी मागायला लावली, आणि तिथूनच त्याला गोंदिया पोलीस ठाणे इथे नेऊन त्याची तक्रार करण्यात आली,त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (बी. एन. एस.)2023 कलम 299 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.