हनपायली ग्रामपंचायत पुसटोला (ता. धानोरा) येथे जय बिरसामुंडा क्रीडा मंडळाद्वारे आयोजित भव्य ग्रामीण कबड्डी व व्हॉलिबॉल स्पर्धेचे उद्घाटक म्हणून आ. डॉ. मिलिंद भाऊ नरोटे उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहित केले.
ग्रामीण भागातील युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा आणि कौशल्य आहे. गरज आहे ती फक्त त्यांना योग्य संधी आणि व्यासपीठ मिळवून देण्याची. क्रांतिकारी जननायक बिरसा मुंडा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हे तरुण मैदानावर आपली जिद्द दाखवत आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे.
यावेळी सोबत भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेश भुरसे, भाजपा तालुकाध्यक्ष साजण गुंडावार, सरपंच बाबूराव मठ्ठामी, सिन्नूभाऊ दुल्लमवार, युवानेते अविनाश पोरेटी, महेश चिमुरकर, पवन येरमे, भूषण, परमेश्वर गावडे तसेच मंडळाचे पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.