विकासापासून कोसो दूर असणारा बंजारा समाज माजलगाव मतदार संघामध्ये निर्णय भूमिका बजावणार-रामशेठ राठोड
पत्रकार परमेश्वर चांदणे. मराठवाडा ब्युरो आगामी निवडणुकांचे बिगुल वाजले असून माजलगाव मतदार संघामध्ये ही निवडणूक रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिसून येत आहेत. या मतदारसंघांमध्ये अनेक तरुण, तडफदार उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरण्याचे स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. अशातच बंजारा समाजाची तरुण तडफदार नेते रामशेठ राठोड यांनी सांगितले की, आगामी निवडणुकीमध्ये माजलगाव मतदार संघाचा भावी आमदार निवडून देण्यामध्ये बंजारा समाजाची निर्णय भूमिका असणार आहे.
माजलगाव मतदार संघ हा गेली अनेक वर्षापासून प्रस्थापित राजकारण्यांचा मतदारसंघ राहिला असून या मतदारसंघांमध्ये इतर भटक्या, विमुक्त, जाती जमाती, ओबीसी यांचा कदापिही उमेदवार या मतदारसंघाने स्वीकारलेला नाही. परंतु असे असले तरीही आगामी विधानसभा ही रंगतदार होणार असून माजलगाव मतदार संघातील बंजारा समाज यातील महत्त्वाचा घटक ठरणार आहे. असे मत बंजारा समाजाचे नेते, प्रसिद्ध उद्योजक रामशेठ राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले
मनोदय व्यक्त केला. ते पुढे बोलताना म्हणाले की, बंजारा समाज म्हटलं की दूर आडरानात वाडी, वस्ती, तांड्यावर राहणारा समाज हा आज पर्यंत विकासापासून कोसो दूर आहे. आडरानात वाडी, वस्ती, तांड्यावर हा समाज राहतो परंतु आज पर्यंत तांड्यावर जाण्यासाठी नीट व्यवस्थित रस्ते नसून अनेक अशा तांड्यावर वस्ती करून राहणाऱ्या माझ्या समाजाला प्रवास करण्यासाठी नीट रस्ता नाही आज देखील त्यांना चिखल, मातीतून जीवघेणा, खरडतर प्रवास करावा लागतो आहे. काही ठिकाणी रस्ते आहेत मात्र त्याची अत्यंत बिकट दुरावस्था झालेली आहे. अनेक अशा तांड्यावर रस्त्याचा अभाव पाहायला मिळतो. आज देखील हा समाज विकासापासून सुखसोयी पासून वंचित आहे. या समाजाचा प्रमुख व्यवसाय हा शेती तसेच ऊसतोड हाच व्यवसाय आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हा समाज ना दसरा, ना दिवाळी करतो ऐन सनासुदीच्या दिवसात ऊस तोडणी साठी लहान लहान मुलाबाळासह वृद्धांसह ऊस तोडणी करत राणा वनात राहतो. परंतु या समाजाच्या व्यथा आज पर्यंत कुठल्याही
लोकप्रतिनिधींनी त्यांना समजावून घेतले नाही. रामसेठ राठोड लोकप्रतिनिधींनी या समाजाचा वापर करून हे सामाजिक, घेण्यात धन्यता मानली असून या समाजाचा शैक्षणिक, वापर निवडणूक काळापुरताच वापर केलेला आहे. निवडणुका येतात निघून जातात निवडणूक काळामध्ये उमेदवार तांडा, वस्तीवर येऊन आश्वासनांची बरसात करतात निवडणूका झाल्या की ते ढुंकूनही पाहत नाहीत. या समाजाला कणखर असे नेतृत्व लाभले नसल्यामुळे आजही हा समाज सुखसोई व विकासापासून कोसो दूर आहे. या मतदारसंघातील बंजारा समाज हा 35 ते 40 हजाराच्या आसपास असून आगामी निवडणुकीमध्ये माजलगाव मतदार संघाचा आमदार निवडून देण्यामध्ये निर्णायक भूमिका बजावणार आहे. असे मत बंजारा समाजाचे नेते, प्रसिद्ध उद्योजक रामशेठ राठोड यांनी व्यक्त केले असून त्यांनी या समाजामध्ये जागरुकता निर्माण व्हावी म्हणून गेली वर्षभरापासून वाडीवस्ती, तांड्यावर जाऊन येथील नागरिकांच्या व्यथा जाणून घेत त्या सोडवण्याचा आटोकाट प्रयल केला आहे.
सांस्कृतिक धार्मिक
कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत असून अनेक असे लोकोपयोगी कार्यक्रम ते राबवत आहेत. अशा या दानशूर नेतृत्वाच्या रुपाने बंजारा समाजामध्ये एक तरुण, तडफदार, कणखर नेतृत्व लाभल्याच्या भावना समाजातून व्यक्त होत आहेत. त्यांच्याकडे हा समाज एक आशेचा किरण म्हणून पाहत आहे. ते आपली निर्णायक भूमिका लवकरच स्पष्ट करणार असून मतदारसंघाला भावी आमदार देण्यास बंजारा समाज हा निर्णय भूमिका बजावणार आहे त्यामुळे रामशेठ राठोड जो निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे असे या समाजा मधून बोलले जात आहे.