फियांदी नामे- मयुर दत्तु सोनार वय ३० व्यवसाय-चहा दुकान व जनरल स्टोअर्स रा. करवंद ता. शिरपूर जि.धुळे यांनी

फिर्याद दिली की. दि.०८/०७/२०२५ रोजी रात्री ०९.३० वाजता ते दि.०९/०७/२०२५ रोजी सकाळी ०६.०० वाजेचे दरम्यान ग्रामपंचायत कार्यालय जवळ करवंद ता. शिरपुर जि. धुळे येथिल त्यांचे कृष्णामाई अमृतुल्य चहा दुकान व जनरल स्टोअर्स नावाचे बंद दुकानाचे शटरचे कुलूप तोडुन शटर उघडुन दुकानात प्रवेश करून दुकानातील टेबलचे ड्रावरमधुन २६,५००/- रूपये रोख रक्कम कोणीतरी ज्ञात चोरट्याने चोरून नेलेबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर शहर पो.स्टे. जि.धुळे गुरनं. ३४६/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१ (४), ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरनमुद गुन्ह्याचे अनुषंगाने मा. पोनि श्री किशोरकुमार परदेशी यांनी वेगाने तपासचक्रे फिरवित अज्ञात आरोपी व गेलेमालाचा शोध घेण्यावावत गुन्हे शोध पथकास आदेशित केले.
त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार हे अज्ञात आरोपीताचा व गेलेमालाचा शोध घेत असतांना पोहेकॉ राजेंद्र रोकडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, करवंद ता. शिरपूर जि. धुळे गावातील कृष्णामाई अमृततुल्य चहाचे दुकान फोडुन चोरी करणारा इसम हा करवंद गावातील तबरेज शेख नाजीम शेख असुन त्यानेच सदरची चोरी केल्याबावत गुप्त बातमी मिळाल्याने वरनमुद इसमाचा करवंद गावात तसेच शिरपूर शहरात शोध घेत असतांना सदरचा इसम हा कळमसरे गावाजवळील अरूणावती नदीचे पुलाजवळ पायी चालत असतांना मिळुन आल्याने त्यास थांबवुन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव तबरेज शेख नाजीम शेख वय २४ रा. करवंद ता. शिरपूर जि. धुळे असे असल्याचे सांगुन त्यास शिताफीने ताब्यात घेवुन त्यास विश्वासात घेवुन सदर गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यास सदर गुन्ह्यातील चोरून नेले रोख रूपये त्याने कोठे व कोणाकडे ठेवले आहेत याबाबत विचारपूस करता त्याने सदरचे पैसे त्याचेकडेस असल्याचे सांगितल्याने लागलीच सदर ठिकाणी दोन इसमांना पंच म्हणुन बोलावुन त्यांचे समक्ष वरनमुद इसमाची अंगझडती घेता त्याचे पॅन्टचे उजव्या खिशात रोख रूपये मिळुन आले त्यांचे वर्णन खालील प्रमाणे,
अ.क्र.
किंमत
मुद्देमालाचे वर्णन
०१
२४,५००/-
रूपये रोख रक्कम त्यात ५०० रूपये दराच्या ४९ भारतीय चलनी नोटा
०२ १,५००/-
रूपये रोख रक्कम त्यात १०० रूपये दराच्या १५ भारतीय चलनी नोटा
एकुण २६,०००/- रूपये
येणेप्रमाणे वरनमुद आरोपी नामे तबरेज शेख नाजीम शेख वय २४ रा. करवंद ता. शिरपूर जि.धुळे याचेकडुन सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले रोख रकमेपेकी २६,०००/- रूपये रोख रक्कम हस्तगत करून सदरचा गुन्हा २४ तासांचे आत उघडकीस आणुन उल्लेखनीय कार्मागरी केली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोहेकॉ राजेंद्र रोकडे हे करीत असुन वरनमुद आरोपीतास मा. न्यायालयात हजर करून पुढील अधिक तपास सुरू आहे.
सदरची कार्मागरी मा. पोलीस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनिल गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक श्री. किशोरकुमार परदेशी, डी.वी. पथकाचे पोहेका/राजेंद्र रोकडे, रविंद्र आखडमल, पोकों/योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, भटु साळुंके, मनोज महाजन, मनोज दाभाडे, सचिन वाघ, प्रशांत पवार, आरीफ तडवी, सोमा ठाकरे तसेच उमेश पवार व होमगार्ड मिथुन पवार अशांनी मिळून केली आहे.
धुळे प्रतिनिधी जितेंद्र पाटील