सध्या वर्तमानपत्रात “पेंढरी –गठ्ठा क्षेत्रातून भाजपा मधून शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल” या प्रकारच्या खोट्या बातम्या वर्तमानपत्रातून छापून येत आहेत यासाठी भारतीय जनता पार्टी धानोरा तालुका तर्फे खुलासा)
स्वार्थासाठी भाजपात आलेले परमेश्वर गावडे, आता खोट्या बातम्यांच्या आधारे काँग्रेसमध्ये “मोठेपणा” मिळवू पाहत आहेत!
धानोरा तालुक्यातील दुर्गापूर येथील सरपंच परमेश्वर गावडे हे कधीही भारतीय जनता पार्टीचे अधिकृत कार्यकर्ते नव्हते. भारतीय जनता पार्टी ही विचारधारेवर उभी असलेली कार्यकर्त्यांची संघटना आहे. येथे कार्यकर्ते निष्ठा, तळमळ आणि राष्ट्रसेवेच्या भावनेने जोडले जातात, स्वार्थासाठी नव्हे. मात्र परमेश्वर गावडे यांचा भाजपातील प्रवेश हा केवळ आणि केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी होता.
परमेश्वर गावडे यांनी पक्षासाठी नव्हे तर विशिष्ट व्यक्तीसाठी भाजपा सोबत काही काळ वास्तव्य केले. त्यांना पक्षाची सेवा, धोरणे किंवा कार्यपद्धती यापेक्षा वैयक्तिक फायद्याचीच अधिक चिंता होती. 2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी प्रत्यक्ष काँग्रेसच्या उमेदवारासाठी प्रचार करून आपली खरी भाजप विरोधी भूमिका स्पष्ट केली होती.
असे असूनही आज ते भाजपातून काँग्रेसमध्ये शेकडो कार्यकर्ते घेऊन गेल्याचा दावा करतात, हा निव्वळ एक हास्यास्पद आणि बनावट प्रचार आहे. त्यांच्या सोबत गेलेले २०-२५ लोकांपैकी एकही व्यक्ती भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत कार्यकारिणीचा सदस्य नव्हता, ना तालुका कार्यकारिणीत होते, ना मंडळ पातळीवरील सक्रिय कार्यकर्ते होते.
हे स्पष्ट आहे की, परमेश्वर गावडे यांनी स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी आणि काँग्रेसमध्ये आपली किंमत वाढवण्यासाठी खोट्या बातम्यांचा आधार घेतला आहे. मात्र भाजपाचा कार्यकर्ता विचारधारेने निष्ठावान असतो आणि अशा ‘स्वार्थी’ लोकांच्या खोट्या प्रचारावर तो कधीही विश्वास ठेवत नाही.
भारतीय जनता पार्टीची वाट विचारांची आहे, आणि ती वाट फक्त निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठीच खुली असते.
भारतीय जनता पार्टी तालुका धानोरा