महाराष्ट्राचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस चंद्रपूर मतदार संघातील लोकप्रिय आमदार किशोर भाऊ जोरदार यांच्यातर्फे सेवा दिन म्हणून साजरा करण्यात आला. आमदार किशोर भाऊ जोरदार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा नेते आशिष भाऊ माशीरकर यांनी देवाडा महाकालीनगरी मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले. भाजपा नेते आशिष भाऊ माशीरकर यांनी आपल्या मनोगतात रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले रक्तदान हे सर्वदानापेक्षा महत्त्वाचा असून जात धर्म प्रांत भाषा यांच्या पलीकडे जाऊन माणसाने माणसासाठी केलेले निस्वार्थ कार्य आहे. जे केवळ इतरांना मदत करतेच नाही तर आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. याप्रसंगी भाजपा नेते आशिष भाऊ माशीरकर प्रशांत ताजने,कमलाकरजी येडमे, रवी भाऊ उपरे, विशाल जी रामटेके, सुनील मुळे, केशव उपरे, चापले जी, डॉक्टर सुविधा ताजने, वृंदाताई काळे, नंदाताई मुळे, ज्योतीताई मुळे,मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.