दि.23/092025 रोज मंगळवार
शेतमजुर वाडी आरोग्य केंद्र
भारतीय जनता पार्टी हादगाव पूर्व मंडळाच्या वतीने आयोजित
आज तामसा येथे सेवा पंधरवडा निमित्त रोगनिदान, नेत्ररोग तपासणी शिबिर संपन्न.
देशाचे लोकप्रिय यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवडा सप्ताहाचे आयोजन केले आहे. या निमित्ताने आज मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता तामसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रोगनिदान, नेत्ररोग तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले..
रोगनिदान,नेत्ररोग तपासणी शिबिराचा आष्टी तामसा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घेतला,नेत्ररोग तपासणी शिबिरामध्ये सहभागी नागरिकांना घरपोच मोफत चष्मे देण्यात येणार आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी,सर्व कर्मचारी आशा सेविका अंगणवाडी ताई भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले..