म्हासोली ता.कराड जि.सातारा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी वार्षिक सर्वसाधारण सभा.
कराड तालुक्यातील सर्वात जुनी1947साली सोसायटी स्थापन करण्यात आली म्हणून सर्वात जुनी ओळखली जाते. 76वी.वार्षिक सर्वसाधारण सभेत सोसायटीचे चेअरमन श्री.अमोल पाटील व्हाईस चेअरमन श्री.विजयकुमार शेवाळे सा.जि.बँकेचे विकास अधिकारी श्री.मारुती शेवाळे व सर्व संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रथम जो जम्मू काश्मीर येथे जे आपले बांधव व जवान शहीद झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली नंतर सचिव श्री.महेश मोहीते यांनी सभेचे प्रोंसिडींग वाचून दाखवले नफा तोटा पञक वाचुन दाखवले. सभासदाना 7 टक्के बोनस वाटप करण्यात येणार आहे असे सांगून. सोसायटीला अ वर्ग मिळाल्याबद्दल संचालक मंडळाचे अभिनंदन करण्यात आले.संचालक मंडळ यांनी एक चांगला निर्णय घेतला कि फक्त म्हासोली भैरवनाथ विद्यालय येथेच दहावीत प्रथम क्रमांक मिळवणा-या विद्यार्थ्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे.असा ठराव मंजूर करण्यात आला. सभा खेळीमेळीत संपन्न झाली. परंतु काहीजण ब वर्गात सभासद येऊन विनाकारण ढवळाढवळ करत असतात.सोसायटीत वडील सभासद असतात पण त्यांची मुले येवून कारण नसताना सभेत गोंधळ निर्माण करतात. तरी इथुन पुढे असे होणार नाही याची दक्षता संचालक मंडळ यांनी घ्यावी असे सभासदामध्ये कुजबुज चालु होती. सभेचा सांगता विजय शेवाळे यांनी केला.
सातारा जिल्हा प्रतिनिधी सुहास पाटील