
*हेमंत (मन्नू ) लिल्हारे यांना तिरोडा विधान सभा ची महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता.*
तिरोडा – महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात 200 ते 225 जागा विधानसभा करीता लढण्याचे ठरविले आहे या संबंधाची बातमी *मनसे* च्या नेत्यांनी प्रसार माध्यमाना दिली आहे, याचा अनुसंघाने तिरोडा विधानसभा मध्ये कार्यरत महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे जिल्हा अध्यक्ष हेमंत (मन्नू ) लिल्हारे यांची संपूर्ण विधानसभा क्षेत्रात चांगलीच पकड असल्यामुळे भाविष्यात त्यांना उमेदवारी मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. हेमंत लिल्हारे मागील 15, ते 20 वर्षा पासून समाजकारण आणि राजकारणात सुद्धा आहेत.त्यांनी क्षेत्रात बऱ्याच लोकांना व्यतिगत असो की सामाजिक अशी भरपूर मदत केली आहे.तिरोडा विधानसभा मध्ये जर लिल्हारे यांना उमेदवारी मिळाली तर इथे तिरंगी, चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे, राष्ट्रवादी शरद पवार गट मधून रविकांत बोपचे प्रयत्नशील आहेत, तसेच bjp मधून आमदार विजय रहांगडाले, संजय टेमभरे, पंकज रहांगडाले, ओम कटरे यांच्या नावाची चर्चा जोरात सुरु आहे तर काँग्रेस मधून माजी आमदार दिलीप बनसोड, ओम पटले, रमेश टेमभरे, आणि गोरेगाव क्षेत्रातून दोन, तीन लोकांची दावेदारी असल्याचे माहिती मिळाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट भारतीय जनता पक्ष महायुती मध्ये सोबत असल्यामुळे त्यांच्याकळे उमेदवारी मिळणे फार कठीण दिसत आहे, तरी पण डॉ, संदीप मेश्राम आणि जगदीश बावान्थडे हे प्रयत्नशील दिसत आहे, पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस चे खासदार प्रशांत पडोळे निवडून आल्यामुळे काँग्रेस ची बाजू आज च्या घडीला मजबूत दिसत आहे.
प्रवीण शेंडे
जिल्हा प्रतिनिधी
गोंदिया
मो.9834486558