चाळीसगाव प्रतिनिधी:- संपूर्ण राज्यासह चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात देखील निवडणूकीची रंगत वाढली असून संपूर्ण मतदारसंघात सध्यातरी भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नावाचीच चर्चा होतांना दिसत आहेत. महिला, पुरुष, तरुण अबालवृद्ध सगळ्यांच्या तोंडी फक्त मंगेश चव्हाण हेच नाव ऐकायला मिळत असल्याने ही निवडणूक एकतर्फी होत असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.
तालुक्यातील कोणत्याही गावात गेलं तरी प्रत्येक घरात कोणत्या ना कोणत्या प्रकारे महायुती सरकारच्या योजना असोत किंवा आमदार मंगेश चव्हाण यांच्या सामाजिक दायित्वातुन शिष्यवृत्ती योजना, सायकल वाटप, दप्तर वाटप, भाऊबीज, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या मुलींच्या लग्नासाठी कन्यादान योजना असेल तसेच तरुणांना रायगड वारी, ज्येष्ठांसाठी पंढरपूर वारी असो अशा अनेक माध्यमांतून आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे कोणत्याही कानाकोपऱ्यात गेलं तरी प्रत्येकाच्या ओठावर मंगेश चव्हाण आणि कमळ हेच नाव ऐकू आला येत असल्याने आजघडीला निवडणुकीत अंतिम टप्प्यात आमदार मंगेश चव्हाण यांची विजयाकडे वाटचाल होतांना दिसत असून सर्वदूर कमळ चीच चर्चा जोर धरताना दिसत आहे.
गावांमध्ये,शहरात ठिकठिकाणी गृप चर्चांमध्ये तालुक्यातील होत असलेल्या विकासकामांबाबत विषय कानावर पडत असून आश्वासन न देता प्रत्यक्ष करोडो रुपयांची विकासकामे करुन दाखवली असून आमदार मंगेशदादा चव्हाण यांना पुन्हा निवडून दिले तर नक्कीच यापेक्षा अजून कित्येक पटीने विकासकामे होतील आणि गेल्या ५० वर्षातील सर्व क्षेत्रांतील बॅकलॉग भरून आपला तालुका एका वेगळ्या उंचीवर जाईल त्यामुळे मंगेश चव्हाण यांना पुन्हा संधी दिली पाहिजे असं देखील लहान मोठ्या सगळ्यांच्या तोंडी ऐकायला मिळत आहे.
आता तर प्रत्यक्ष मतदानासाठी फक्त काही तास शिल्लक असताना संपूर्ण मतदारसंघ कमळ मय झाल्याचे चित्र निर्माण झाले असून आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी बोलण्यापेक्षा प्रतक्ष कृतीतून विकासाचा डोंगर उभा केला असल्याने मंगेदादा चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक एकतर्फी झाली की काय? असंच काहीसं चित्र सध्या तरी दिसत आहे. याउलट उबाठा चे उमेदवार उन्मेष पाटील यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकी मध्ये जे आश्वासन दिले होते त्यापैकी एकही ते पुर्ण करु शकले नसल्याने त्यांच्यावर मतदारांचा रोष असल्याचे देखील बोलले जात आहे. आमदार झाले त्यानंतर त्यांना मोठ्या अपेक्षेने मतदारांनी खासदार देखील केले पण सत्ता असुन देखील कोणतेही ठोस काम दहा वर्षांत त्यांनी केले नाही असं देखील यावेळी चर्चांमध्ये ऐकायला मिळत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी कोणतेही आश्वासन न देता फक्त विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवली होती आणि गेल्या ५ वर्षांत मंगेश चव्हाण यांनी मतदारांचा विश्वास सार्थ ठरवत शाश्वत विकास केला असून त्याला सामाजिक दायित्वाची देखील जोड देऊन मतदारसंघातील जनतेचा विश्वास जिंकला आहे. म्हणून ही निवडणूक आमदार मंगेश चव्हाण यांच्यासाठी जनतेनेच डोक्यावर घेतली असल्याने विजय निश्चित मानला जात आहे.
—————————————-
————————
” चाळीसगावची जनता निश्चितच विकासाच्या बाजूने उभे असून बोलबच्चनगिरी करणाऱ्याला निवडणुकीत धडा शिकवल्या शिवाय जनता स्वस्त बसणार नाही, 23 तारखेला जनतेचा विजय झालेला असेल. ”
:- आमदार मंगेश चव्हाण