सरकारी नळ योजनेचे पाणी पुरवठा सुरळीत करा

सरकारी नळ योजनेचे पाणी पुरवठा सुरळीत करा
तिरोडा शहराच्या आंबेडकर वार्ड परिसरात गेल्या १० दिवसा पासुन नळ योजनेच्या पाण्याचा पुरवठा खंडीत झालेला असुन नागरीकांना पिण्याच्या पाण्यापासुन वंचित रहावे लागत असुन सुध्द पाण्या अभावी रोग-राई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हया बाबद नगर परिषद कार्यालय तिरोडा इथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत तिरोडा च्या वतीने निवेदन देऊन तात्काळ कार्यवाही करूण पिण्याचे पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदन देतांना अखिल भारतीय ग्राहक पंचायत तिरोडा तालुका चे अध्यक्ष अब्दुल रफीक शेख, उपाध्यक्ष-सुशिल भातनकर, सचिव-महादेव घरजारे, संगठन मंत्री-वाल्मीक राऊत, कोषाध्यक्ष-अशोक रहांगडाले व इतर पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक हजर होते.

प्रवीण शेंडे
ब्युरो चीफ
गोंदिया

Leave a Comment