रिपोर्टर वाशिम जिल्हा प्रताप नागरेवा
रा जहागीर येथील यूवा कार्यकर्ते विलास विश्वनाथ ढगे यांची सावता परिषदेच्या वाशीम जिल्हाध्यक्षपदी नूकतीच निवड करण्यात आली आहे,
सावता परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक मा श्री कल्याण काका आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सावता परिषदेचे कार्याध्यक्ष मा श्री पांडुरंगजी कोठाळे यांच्या हस्ते वाशिम विश्राम गृह येथे आज दि १० रोजी सावता परिषद वाशिम जिल्हा अध्यक्षपदी निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले आहे, विलास ढगे याचे सामाजिक संघटनात्मक कार्य उल्लेखनीय असून समाजा प्रती असणारी त्यांची धडपड लक्षात घेता, त्यांची निवड करण्यात आली आहे,
माझ्यावर विश्वास टाकून समाजाने माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे, त्या समाजाच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, सामाजिक संघटण कसे मजबूत होईल,यावर प्रकर्षाने लक्षकेंद्रीत करणार असे प्रतिपादन सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष विलास ढगे यांनी केले आहे, तसेच याच वेळी जिल्हा सरचिटणीस म्हणून विकी राऊत आणि वाशिम तालुका अध्यक्ष पदी श्री प्रभाकर माल तर मंगरूळनाथ तालुका अध्यक्ष पदी श्री प्रदीप घाटे यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ समाजसेवक श्री वासुदेव क्षिरसागर, ठाकरे सर, पांडुरंग कोठाळे यांची उपस्थिती होती