रोजी पोलीस स्टेशन राजुरा येथील पोउपनि पांडुरंग हाके सोबत पोशी तिरुपती जाधव

महाराष्ट्र,चंद्रपूर (क्रिष्णाकुमार संवाददाता)

दिनांक 06/03/2025 रोजी पोलीस स्टेशन राजुरा येथील पोउपनि पांडुरंग हाके सोबत पोशी तिरुपती जाधव /२८२ हे पोस्टे परीसरात खाजगी वाहनाने रवाना होऊन पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की महाराजा ट्राव्हल्सने सुगंधित तंबाखू मजा हा राजुरा येथील नाका no ०३ येथे येते आहे अशी खात्रीशीर खबर मिळाल्याने नाका नं 03 येथे क्रिष्णा हॉटेलचे समोर थांबून असताना महाराजा ट्रॅव्हल्स आली व त्यामधून पार्शल बाहेर काढले सदर पार्शल मध्ये एका पांढऱ्या रंगाच्या नायलन चुगळीवर मुस्कान राजुरा असे लिहलेले पार्शल चेक केलो असता त्यामध्ये मजा 108 हुक्का शिषा तंबाखू असे लिहलेले सुगंधित तंबाखूचे एकूण 80 नग डब्बे प्रति नग 200 ग्रॅम वजनाचे प्रति नग अंदाजे किंमत 1250 रु अशा एकूण 1,00,000/-₹ चा माल मिळून आला. 

▶️ *आरोपी – महादेव काशीनाथ अडवे वय 36 वर्ष रा जवाहरनगर राजुरा ता राजुरा जि चंद्रपूर

▶️ * अप क्र 109/2025 कलम -अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 कलम 30(2)(A), 26(2)(i), 26(2)(iv) 59 सहकलम 223,274,275,123 BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

 

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन सा. मा.अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू मॅडम मा.उपविभागीय पोलीस अधिकारी साखरे सा याचे मार्गदर्शनात मा.प्रभारी अधिकारी ips हिरडे सा यांचे नेतृत्त्वाखाली पोउपनी पांडुरंग हाके,स्टॉप पोशी तिरुपती जाधव /२८२ यांनी केली आहे…

गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल पो. स्टे. राजुरा येथील मुद्देमाल मोहरर कडे जमा केला असून तपास चालू आहे

माहितीस्तव सविनय सादर,

 

प्रभारी अधिकारी

पोलीस स्टेशन राजुरा

Leave a Comment