कराड तालुका सञ न्यायालयात सुनावणीवेळी आरोपीला फिट

न्यायाधीश धावल्या मदतीला कराड येथील अतिरिक्त व जिल्हा सञ न्यायालयात बुधवारी सकाळी 11 वाजता पाटण तालुक्यातील घाणबी येथील प्रदिप तुकाराम शिर्के यांच्यावरील खटल्याची सुनावणीस आलेल्या आरोपीला अचानक फिट आल्यामुळे त्याचा त्यात जीव गुदमरला त्यावेळी न्यायाधीश साहेबानी त्याचे गांभीर्य ओळखून लगेच आरोपीवर प्राथमिक उपचार चालु केले.व लगेच तातडीने रुग्णवाहिका बोलवून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

न्यायाधीशांची धडपडन्या.यु.एल.जोशी या आरोपी प्रदिप शिर्के याला शुद्धीवर आणण्यासाठी प्रथमोपचार म्हणून कर्मचाऱ्यांना हाॅटेल मधुन कांदा आणण्यास सांगितले व तो कांदा फिट आलेला आरोपीच्या नाकाला वास देउन त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. राञी उशीरा दवाखान्यात चौकशी केली असता प्रकृतीस्थीर असल्याचे सांगण्यात आले.

सातारा-सुहास पाटील कराड

Leave a Comment

06:09