G-2P164PXPE3

राजे छत्रपती ब्लड डोनर ग्रुपच्यावतीने 21 दिवस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा करण्यात आला जलाभिषेक

इंडियन टीवी न्यूज जिल्हा प्रतिनिधी प्रताप नागरे वाशिम

वाशिम : राजे छत्रपती ब्लड डोनर ग्रुप यांच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा सलग 21 दिवस जलाभिषेक करून सदर उपक्रमाचा दि. 6 एप्रिल रोजी रामनवमीनिमित्त समारोप करण्यात आला. सदर उपक्रमाला तिथीनुसार शिवजयंती दिनी दि. 17 मार्च पासून सुरुवात करण्यात आली होती. यावेळी उत्कृष्ट राजमता जिजाऊ वेशभूषेसाठी रुद्रायणी सचिन राऊत, व तारा राणी वेशभेषेसाठी संस्कृती पांडूरंग टेकाळे तसेच उत्कृष्ट नृत्य करणार्‍या ममता नवघरे, सांची टाले, लिना कांबळे, श्रृष्टी घुगे, सानिका रोकडे, तन्नु वानखेडे यांना प्रमाणपत्र व शिल्ड देवून गौरव करण्यात आला.
या उपक्रमाला संपूर्ण 21 दिवस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये अजय मोतीवार, मनिष डांगे, सौ. संध्या सभादिंडे, पुरण बदलाणी, कुणाल लंके, मंगेश वानखेडे, भूषण देशपांडे, शेखर रोठे, आशुतोष वानखेडे, अमोल धोटे, वैशाली मेश्राम, मिथून चहारे, उज्वल देशमुख, किशोर थोरात, गोपाल जाधव, प्राचार्य श्यामराव धाडवे , किसनराव धोटे, प्रविण बनसोड, वाशिमची पियु, किशोर कांबळे यांच्यासह एनसीसी विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.

Leave a Comment

03:45