किट्टी आडगाव सर्कल सह हरकी लिमगाव मध्ये दारू मटका पते नावाचा जुगार मोठ्या प्रमाणात सुरू
बीट जमादार करतात तरी काय काम ?किट्टी आडगाव सर्कलच्या जनतेचा सवाल
माजलगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक चे दुर्लक्ष
पत्रकार परमेश्वर चांदणे इंडियन टीव्ही चीफ ब्युरो बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी बीड जिल्ह्यात अवैध धंद्याना आळा घालण्याचे काम केले आहे
परंतु माजलगाव तालुक्यातील मटका आजही चालूच आहेत या अवैध मटक्याच्या जुगारा मुळे व पते याचया मुळेअनेक गोरगरीब मजूर यांचे संसार उध्वस्त होत आहेत
माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव सर्कल सह हारकि लिमगांव गावात मटका नावाचा जुगार सर्रास सुरू बीट जमदार सह पोलीस हवालदार करतात तरी काय अशी चर्चा
किट्टी आडगाव सर्कल च्या जनते मध्ये सुरु
बीड जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून अवैध धंदे वाढले होते गुंडगिरी वाढली होती या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी तरुण तडफदार पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना महाराष्ट्र सरकारने नियुक्त केले त्यांनीही आपली धडाडीची कारकीर्द दाखवत बीड जिल्ह्यातील गुटका किंग, वाळू किंग, तसेच गुडांचे आका यांच्यावर जरब निर्माण केली यामुळे कावतांची दहशत कुठेतरी फावत आहे याचे दर्शन बीड जिल्ह्याला झाले असले तरी
मात्र मटका जुगार राजरोसपणे माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव सर्कल सह हारकि लिमगाव भागात चालू आहे आपण एक रुपया लावला तर नव्वद रुपये मिळणार या आशेने मजुरी काम करणारे महिला पुरुष यामध्ये भरडले जात आहेत मटका तर लागतच नाही मात्र अशा खूप वाईट असते आज ना उद्या आपल्याला मटका लागेल या हेतूने रोजंदारी करणारे मजूर आपण दिवसभर केलेल्या कामाचे पूर्ण पैसे मटक्यावर लावत आहेत आणि कुटुंबातील भांडण होऊन संसाराचे वाटोळे होत आहे
माजलगाव तालुक्यातिल किट्टी आडगाव सर्कल सह हारकि लिमगाव मध्ये मटका व पते नावाचा जुगार सर्रास सुरू आहे
माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा. बालक कोळी यांनी किट्टी आडगाव सर्कल सह हारकि लिमगाव गावात सर्रास मटका नावाचा जुगार सुरू आहे मटका नावाचा जुगार बंद करुन त्याच्यावर कारवाई करावी अशी किट्टी आडगाव सर्कलच्या नागरिकांनी आमच्या. वार्ताहर शी बोलताना सांगितले आहे