
इंडियन टीव्ही न्यूज प्रताप नागरे जिल्हा प्रतिनिधी वाशिम
17/05/2025 श्री.नवदीप अग्रवाल (भा.पो.से ) सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग वाशिम चार्ज मंगरूळपीर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम व मंगरूळपीर येथील कार्यालयीन स्टॉफ सह ,मंगरूळपीर शहरात
जि. प.ग्राउंड जवळ शेलुबाजार कडे जाणाऱ्या रोडवर अवैध रित्या देशी-विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपी 1 विशाल श्रीराम शिवहरे, वय 26 वर्ष रा.जयस्तंभ चौक कारंजा,
2 गजानन टेकराव चौकशे रा. जयस्तंभ चौक कारंजा यांच्याकडून बोलेरो वाहन क्रमांक
MH 40 BQ 5786 सह देशी विदेशी दारू किंमत 201220/– लाख रू, व मोबाईल असा एकूण किंमत 1011220 /– लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, दारू पुरवठा करणाऱ्या मध्ये रोहित लुल्ला, वैभव (काल्या ), अनुप, भोला ,गोलू ,तन्नू, दीपक शिवहारे, मंगेश जाधव रा. पारवा, बाबू ठाकूर रा मंगरूळपीर व दारू खरेदी करणाऱ्या मध्ये दारासिंग राठोड रा. भडशिवणी, गौतम रा. खडी धामणी, राम रा. कामरगाव , बाळू वैरागळे रा. खेर्डा, पिंटू किर्दक रा. काकड शिवणी, पुंडलिक पवार रा. भडशिवणी , प्रकाश वानखेडे रा.बांबर्डा , उमेश रा.मोखड पिंप्री, अंकुश रा. आखत वाडा, अतुल शिंदे रा. खेर्डा, उदयसिंग राठोड रा.
वेळगाव, गुलाबराव तायडे रा. बांबर्डा, धीरज खराड रा. पोहा, संतोष रा. पोहा, गौतम इंगोले रा. पारवा कारंजा, सिद्धार्थ रा. चांधई ता. कारंजा यांचेवर पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ई सह कलम 3(5) भारतीय न्याय संहिता प्रमाणे नोंद करून कारवाई केली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक वाशिम श्री अनुज तारे ( IPS),
श्रीमती लता फड अप्पर पोलीस अधीक्षक वाशिम यांच्या मार्गदर्शनाने श्री नवदीप अग्रवाल पोलीस अधीक्षक उपविभाग वाशिम यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयीन स्टाफ सपोनि अतुल इंगोले पोहेकॉ रवींद्र कातखेडे ,पोकॉ अनंता
डौलसे , सुमित चव्हाण, गणेश बाजाड ,शंकर वाघमारे व इतर स्टॉफ यांनी कारवाई पार पडली,