मंत्री संजय राठोड यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी तालुक्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीचा घेतला आढावा
प्रतिनिधी विठ्ठल कदम शिवपुरीकर
हदगाव/धानोरा
जलसंधारण मंत्री संजय राठोड हे २५ सप्टेंबर रोजी हदगाव दौऱ्यावर दुपारी बारा आले असून त्यांनी तालुक्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीच्या काठावरील रुई धानोरा या गावातील शेतकऱ्याची संवाद साधला व पूर परिस्थितीचा आढावा घेतला. आ. बाबुराव कदम यांनी तालुक्यातील शंभर टक्के शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असून पिके ९० दिवसाचे असून ६० दिवस पाणी राहत असल्यामुळे शंभर टक्केच पीक पाण्याखाली जात असल्याचे मुद्दे पटवून दिले. तालुक्यातील तीन नद्या पैनगंगा, कयाधु
लाखाडी नदी वाहत असल्याने संपूर्ण तालुका हा पाण्याखाली गेला असल्याचे सांगितले मंत्री संजय राठोड यांना शेतकऱ्यांनी घेराव घातला होता शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या व्यथा त्यांनी त्यांच्या समोर मांडल्या तर धानोरा येथील शेतकरी गजानन शिंदे यांनी निवेदन दिले व स्वतः
सांगितले की तालुक्यातील कयाधू नदी व पैनगंगा नदीला आलेल्या भयानक पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे व अतिवृष्टीमुळे सर्व पीक खरडून गेले असून या बरोबर शेतातली सुपीक माती सुद्धा बाहुन गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी आणि सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे असे त्त्यांनी मंत्री संजय राठोड यांना निवेदन देऊन स्वतःही सांगितले. सरकार शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी असून अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान पाहून जास्तीची मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी खासदार सुभाष वानखेडे. शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख. उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे. तहसीलदार सुरेखा नदि. माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील बाभळीकर. सरपंच अमोल पाटील रुईकर, बालासाहेब कदम. शरद कदम. व शेतकरी बांधव उपस्थित होते.