मनपा व जि.प.वर भगवा फडकणारच शिवसेना सहसंपर्कप्रमुख स.दर्शनसिंग सिध्दु यांचा विश्वास
नांदेड जिल्हा विठ्ठल कदम शिवपुरीकर (प्रतिनिधी) आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना नंबर वनचा पक्ष राहणार असून, नांदेड महापालिकेसह नांदेड च्या जिल्हा परिषदेवरही शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वास शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख स. दर्शनसिंग सिद्ध महाराज यांना व्यक्त केला.
शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख स. दर्शनसिंग सिद्धू प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतांना राज्य विकासाच्या प्रगतीपथावर होते, शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहोचविण्यासाठी त्यांनी दिवसरात्र एक केले. समाजाच्या प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीही एकनाथराव शिंदे यांचे काम अतुलनीय असे राहिले आहे. ते मुख्यमंत्री असतांना लाडकी बहीण ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात आली आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले. या निवडणुकीच्या काळात नांदेडच्या जनतेने नांदेड दक्षिण-उत्तर या दोन्ही विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकविला, ना. हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि
त्यांच्या अथक परिश्रमांतून नांदेड उत्तर-दक्षिण शिवसेनेचाच बालेकिल्ला असल्याचे त्यांनी सिद्ध करून दाखविले. आ. बालाजीराव कल्याणकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नांदेड उत्तरच्या विकासासाठी सर्वोच्च म्हणजे ३ हजार ३०० कोटी रूपयांचा निधी खेचून आणला होता. नांदेड उत्तरचा कायापालट करण्याचे काम आ. कल्याणकर यांनी केले आहे. वाडी बु. येथील शासकीय रुग्णालय, कृषी महाविद्यालय या महत्त्वाच्या कामांसह हजारो लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या नांदेड शहरातील असदुल्लाबाद येथील इनामी जमिनीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्ग लावून मोठा दिलासा दिला. त्यामुळे नांदेड उत्तरमध्ये आ.कल्याणकर यांच्या रूपाने शिवसेनेचा भगवा दुसऱ्यांदा फडकला,
नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीतही आ. कल्याणकरांनी विकासाची असंख्य कामे केली आहेत, नांदेड दक्षिणमध्ये हेमंत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत एका शेतकऱ्याच्या मुलाला आणि निष्ठावंत शिवसैनिकाला म्हणजेच आनंदराव बोंढारकर यांना आमदार म्हणून निवडून दिले. आ. बोंढारकर यांनीही नांदेड दक्षिणमधील जनतेच्या मुख दुःखात तळमळीने सहभाग घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील जनता शिवसेनेच्या पाठीशी असल्याने नांदेड महापालिकेवर निर्विवादपणे शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा पुनरूच्चार त्यांनी केला, जिल्हा परिषदेतही आपला वरचष्मा सिद्ध करण्यासाठी शिवसेनेने रणनीती आखली आहे.
आगामी काळात नांदेड उत्तरप्रमाणेच नदिड दक्षिण आणि संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महापालिकेत शिवसेनेची सत्ता येणे आवश्यक आहे. यासाठी जनता जनार्दन शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. नव्या विकासाचे ते साक्षीदार होतील आणि विकासाचा अनुशेष भरून निघेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.