जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकोडी येथे शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आले होते।
गोंदिया , रिपोर्ट महेन्द्र कनोजे एकोडी
जि.प.प्राथमिक शाळा एकोडी येथे *शाळापूर्व तयारी मेळावा* क्र.२चे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला जि.प.सदस्या मा. सौ.अश्विनी ताई पटले ह्या अध्यक्ष तर पं.स.सदस्य मा.श्री. अजाबरावजी रिनायत हे उदघाटक होते.प्रमुख अतिथी म्हणून शा.व्य.स.चे उपाध्यक्ष श्री अरुणकुमार जी बिसेन, सद्स्य श्री महेंद्रजी कनोजे, श्री राकेशजी बाळणे, सौ.शारदा ताई बिसेन, सौ.तरन्नूम शेख हे उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रम स्थळी इयत्ता पहिलीत दाखल करण्यात आलेल्या बालकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तद्नंतर उभारण्यात आलेल्या सातही स्टाल्स वरून दाखल करण्यात आलेल्या बालकांची तपासणी करून सोबत आलेल्या मातांना मार्गदर्शन करण्यात आले.प्रास्ताविक श्री.आर.एस.ताजणे(उ.श्रे.मु.)यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन सौ.आशा हरिणखेडे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी सौ.एम.आर.उईके ,सौ.ए.सी. हरिणखेडे, श्री सी.डी.हरिणखेडे व शुभांगी रिनायत मॅडम यानी परिश्रम घेतले.