बांगलादेशा मध्ये अल्पसंख्याक समुदायावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात

बांगलादेशा मध्ये अल्पसंख्याक समुदायावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात तिरोडा बंद 100% यशस्वी

 

तिरोडा

 

बांगलादेशात हिंदू, बौद्ध, जैन, सखल हिंदू समाजबांधवांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज तिरोडा शहरामध्ये व्यापारी प्रतिष्ठानने बंद ठेवून तिरोडा बंद शंभर टक्के सर्व जनतेनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन यशस्वीपणे कडकडीत बंद पाडण्यात आला.

 

उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना सकल हिंदू तिरोडा च्या वतीने निवेदन देण्यात आले. महामहीम श्रीमती द्रौपदी मुरमुजी राष्ट्रपती, भारत सरकार ५ ऑगस्ट २०२४ पासून बांगलादेशात जिहादी कट्टरवाद्यांनी अस्थिरता निर्माण केली आहे. तसेच त्यांनी शेख हसीना सरकार उलथवून टाकले आहे. आता तर हिंदूंवरील हल्ले आणि अत्याचार अधिकच वाढले आहेत.हिंदूंवरील अत्याचार ताबडतोब थांबावे तसेच बांगलादेशातील स्थिती रुळावर यावी आणि तेथील हिंदू समाजाचे जीवन सुकर आणि सुरक्षित व्हावे, यासाठी सकल हिंदू समाजातफर्के पुढील मागण्या भारत आणि बांगलादेश सरकारला केल्या जात आहेत. बांगलादेश सरकारला भारत सरकारतर्फे हिंदू अत्याचाराच्या विरुद्ध कठोर इशारा दिला जावा. मानवाधिकारवादी संघटनांनी हिंदू आणि अन्य अल्प संख्यकांवरील हल्लयांची, अत्याचारांची दखल घेवून हा मुद्दा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर लावून धरावा. बांगलादेशातील हिंदूंच्या जिविताची आणि संपत्तीची रक्षा तसेच महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना पायबंद घातला जावा, यासाठी बांगलादेश सरकारने तातडीने पावले उचलावी. इस्कॉनचे साधू चिन्मय कृष्ण दास यांची तुरुंगातून तत्काळ ससन्मान मुक्तता करण्यात यावी.हिंदू कलाकार, व्यावसायिक, उद्योगपती, खेळाडू, राजकीय नेते तसेच हिंदू मंदिरांना सुरक्षा पुरविली जावी बांगलादेशातील पाकिस्तानी जिहाद्यांच्या हस्तक्षेपाला पायबंद घालावा.

संयुक्त राष्ट्रसंघात हिंदू, बौद्ध, जैन व अन्य अल्प संख्यकांवरील अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला जावा.बांगलादेशातील हिंदू, बौद्ध, जैन व अन्य अल्पसंख्य समाजांच्या रक्षणाची मागणी करणाऱ्या देशोदेशीच्या विविध आंदोलनांना सुरक्षा प्रदान केली जावी. निवेदनाची प्रतीलिपी मा. पंतप्रधान ,मा.गृहमंत्री मा. संरक्षण मंत्री मा.परराष्ट्र व्यवहार मंत्री

मा. मुख्यमंत्री मा.जिल्हाधिकारी, मा. पोलीस अधिक्षक,

मा.उपविभागीय अधिकारी तिरोडा यांना दिली आहे शांततेत सर्व नागरिक सहकार्य केले.

 

प्रवीण शेंडे

ब्युरो चीफ

गोंदिया

Leave a Comment