धानोरा तालुक्यातील पयडी येथे एका वेगळ्याच उर्जेचा आणि जिव्हाळ्याचा अनुभव आला. आदिवासी हलबा/हलबी समाज संघटना, गडचिरोली आणि आदिवासी हलबा/हलबी समाज कर्मचारी महासंघ, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एकता व शक्ती दिवस’ कार्यक्रमात उपस्थित राहून समाज बांधवांशी संवाद साधला.
जेव्हा आपला समाज असा एकत्र येतो, तेव्हा संघर्षाची वाट सोपी होते आणि प्रगतीची दारे उघडतात, हेच आज पयडीच्या मातीत दिसून आले. आपल्या हक्कासाठी लढा देताना आणि समाजाची अस्मिता जपताना तुम्ही जी वज्रमुठ एकजूट दाखवली आहे, ती खरोखरच प्रेरणादायी आहे.
तुमच्या डोळ्यांतील विश्वास आणि चेहऱ्यावरची ही आपुलकी मला सदैव कार्य करण्याची ऊर्जा देते. मी तुम्हाला विश्वास देतो की, समाजाच्या प्रत्येक सुख-दुखात आणि न्याय्य हक्काच्या लढाईत मी तुमचा हक्काचा माणूस म्हणून सदैव खंबीरपणे पाठीशी उभा आहे.
या सुंदर आयोजनाबद्दल आणि दिलेल्या अफाट प्रेमाबद्दल सर्व पदाधिकारी व समाज बांधवांचे मनापासून आभार!
यावेळी माजी आमदार छ.ग. श्री. मतूरामजी पवार भाजप जेष्ठ नेते श्री.रमेशजी भुरसे , माजी भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्री. अनिलची तिडके,भाजपा उपाध्यक्ष श्री.अनिलजी पोहनकर, धानोरा तालुकाध्यक्ष श्री साजनजी गुंडावार, भाजपा सदस्य श्री. पवनजी येरमे,जिल्हा आदिवसी हलबा/हलबी, समाज संघटन गडचिरोली श्री. मनीराम रावते, श्री. माधवजी गावळ, आणि भाजपाचे इतर सदस्य उपस्थित होते. रिपोर्ट अभिजित गाईन