उन्मेष पाटील यांचा पुन्हा एक बोलबच्चन पणाचा नमुना उघड : २००७ मध्ये शाळा मंजूर असताना मी आणल्याचा गवगवा, उन्मेष पाटील यांनी नुकतेच अनु.जाती व नवबौद्ध शाळेतील एका अल्पवयीन मुलाला जबरदस्ती प्रतिक्रिया देण्यास भाग पाडल्याचे आले समोर.
चाळीसगाव प्रतिनिधी: महाविकास आघाडीचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या बोलबच्चन पणाचा अजून एक नमुना समोर आला आहे. चाळीसगाव येथील अनु.जाती व नवबौद्ध मुला मुलींच्या शाळेतील अनु.जातीच्या एका अल्पवयीन मुलाला शाळा प्रशासनाची परवानगी न घेता जबरदस्ती प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले. खरंतर ही शाळेसाठी तत्कालीन आमदार उन्मेष पाटील यांचा काडीमात्र संबंध नसल्याचे समोर आले आहे. फक्त राजकीय स्वार्थापोटी हा श्रेय घेण्याचा निष्फळ प्रयत्न ते करत असल्याचे दिसून येत आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने धोरणात्मक निर्णय घेऊन 2007 मध्ये राज्यात अनुसूचित जाती व नवबौद्ध लोकसंख्या अधिक असलेल्या तालुक्यांमध्ये शासकीय मुला मुलींची निवासी शाळा १०० तालुक्यांमध्ये सुरू करण्यास मान्यता दिली होती. त्यापैकी चाळीसगाव तालुक्यात देखील एक शाळा 2007 मध्ये मंजूर करण्यात आली होती व या योजनेला सुरुवात झाली होती. तेव्हा आमदार प्रा. साहेबराव घोड़े होते. २००७ मध्ये उन्मेष पाटील कुठेच नव्हते. सन २००९ ते २०१४ पर्यत चाळीसगाव चे तत्कालीन लोकप्रतिधी यांच्या अकार्यक्षम पणामुळे सदर शाळेच्या बांधकामासाठी शासकीय जमीन उपलब्ध झाली नव्हती. मात्र सदर शासकीय निवासी शाळा भाड्याच्या इमारतीत सुरु झाली होती.
मात्र शासनाने तत्कालीन आघाडी शासनाने बिघाडी करून सदर चाळीसगावची अनु.जातीच्या मुलांची हक्काची शाळा अन्य तालुक्यात म्हणजेच अमरावती येथे हस्तांतरित केली होती. मात्र २०१४ मध्ये आमदार होऊन ४ वर्ष झोपलेले बोलबच्चन महाशय अचानक २०१८ मध्ये जागे झाले. शासनाची महत्वाकांक्षी मंजूर योजना वापस जाण्याची नामुष्की आपल्यावर येऊ नये.असे झाले तर मागासवर्गीय समाजाला उत्तर द्यावे लागेल म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि तत्कालीन समाजकल्याण मंत्री यांच्यापुढे लोटांगण घातले. महायुती शासनाने भाड्याच्या इमारतीत्त सुरु असलेल्या शाळेतील विद्यार्थाचे नुकसान होऊ म्हणून २०१८ मध्ये सदर शाळा हस्तांतरणाचा निर्णय रद्द केला होता. ही वस्तुस्थिती आहे.
म्हणून माझ्यामुळे ही शासकीय अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला मुलींची शाळा मंजूर झाली व मीच ती अमरावती वरुन हस्तांतरित करुन चाळीसगाव ला आणली ही सिंहगर्जना म्हणजेच उन्मेष पाटील यांचा निर्लज्जपणाचा आणि निर्ढावलेपणाचा कळसच म्हणावा लागेल. इतकेच नव्हे तर तालुक्यातील अनुसूचित जातीच्या हक्काच्या या शाळेचं प्रत्यक्ष बांधकाम सुरू असतानाच संबंधित ठेकेदाराला कोणी त्रास दिला हे देखील जगजाहीर आहे. सदर शासकीय शाळा आणण्यासाठी तत्कालीन आमदार उन्मेष पाटील यांचा काडी मात्रही संबंध नाही. ही वस्तुस्थिती आहे.