यांच्यावर बिबट्याने केला हल्ला//
म्हासोली गावातील शेतकरी महादेव पाटील हे दुपारी 1 वा.जळकामाळ
शिवारात जनांवरासाठी चारा आणण्यासाठी जात असतानाच अचानक हल्ला करून जखमी केले.
महादेव पाटील यांचे 55 वयाचे आहेत. बिबट्याने अचानक हल्ला केल्यामुळे स्वताला हल्ल्यापासून बचाव करत आरडाओरड करण्यास सुरुवात केली.परंतु थोड्याच अंतरावर दिनकर पाटील व श्रीकांत शेटे हे शेतात काम करत असतानाच अचानक ओरडण्याचा आवाज ऐकून तात्काळ त्या दिशेने धाव घेतली व मोठा अनर्थ टळला महादेव पाटील यांना जखमी अवस्थेत उंडाळे येथील
ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु गावातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भिती वाटत असेलच सांगण्यात आले.
बिबटयाने हल्ला केला आहे हे कळताच लगेच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होउन त्याठिकाणी पंचनामा करण्यात आला. वनविभाग परिमंडळ अधिकारी कोळे येथील श्री.बाबुराव कदम साहेब ,पाटील साहेब,चिते साहेब यांनी पहाणी करून लवकरात लवकर शासनाकडून मदत केली जाईल असे आश्वासन देण्यात आले.
**सातारा कराड सुहास पाटील